यंदा दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही जोफ्रा आर्चर, तरी मुंबईने 8 कोटींना घेतलं विकत, कारण काय?

IPL Auction 2022 Updates: आयपीएल 2022 साठी महालिलावात मुंबईने त्यांचा संघ तयार करताना कमाल शक्कल लढवली. ईशान किशन या महत्त्वाच्या खेळाडूसाठी पैसे खर्च करण्यासाठी इतर खेळाडू गमावले, पण संघाचा लाडका खेळाडू ईशानला 15.25 कोटींना विकत घेतलं. याशिवाय त्यांनी आणखी एक डाव खेळला, तो म्हणजे वर्ल्डक्लास खेळाडू जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना खरेदी केलं. पण जोफ्रा दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात खेळणार नाही. असे असतानाही मुंबईने इतकी मोठी रक्कम का घालवली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान जोफ्रा दुखापतीतून ठिक झाल्यानंतर 2023 आणि 2024 आयपीएलमध्ये मैदान गाजवण्यासाठी त्याला संघात घेण्यात आलं आहे. त्यानेही या निर्णयानंतर धन्यवाद केल्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.  

दरम्यान या निर्णयाबाबत मालक आकाश अंबानी म्हणाले,‘‘तो यंदाच्या वर्षी खेळू शकणार नसला तरी तो उपलब्ध झाल्यानंतर जसप्रीत बुमराहसोबत एक अप्रतिम जोडी प्रस्थापित करेल.’’ मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग असणारा आणि माजी क्रिकेटर गोलंदाज झहीर खान याबाबत म्हटला आहे की, बुमराह आणि आर्चर यांना एक खेळताना पाहणं एक रोमांचक गोष्ट असेल. दोघंही दमदार गोलंदाजी करतील, त्यासाठी वाट पाहणंही सार्थक ठरणार आहे.’’ 

हेही वाचा :  यंदाच्या आयपीएल हंगामात काय स्पेशल? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर

असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ

रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख), अर्जून तेंडुलकर (30 लाख)      

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महेंद्रसिंह धोनीने ब्राव्होला शिकवलं शिट्टी वाजवायला,आयपीएल प्रोमो शूटचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

IPL 2023, CSK : आयपीएलचा (IPL) फिव्हर हळूहळू क्रिकेटरसिकांना चढू लागला आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी …

मुंबई इंडियन्स यंदातरी दमदार कामगिरी करणार का? अशी असू शकते प्लेईंग 11

Mumbai Indians Playing 11 : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) मध्ये, मुंबई इंडियन्सचा संघ एका …