या देशात भाड्याने मिळतात ‘पुरूष’; काहीही न करण्याऱ्यांना मिळतो पैसाच पैसा

टोकियो: जगात प्रत्येकजण पैसा मिळवण्यासाठी अफाट मेहनत घेत असतो. पैसा असेल तर आपल्याला आयुष्यात काहीही मिळवता येते. असाच काहीसा प्रकार सध्या जपानमध्ये घडत आहे. 

अजब फॅन्टसी

इंडिपेंडंटमधील वृत्तानुसार, अकारी शिराई नावाच्या तरुणीला तिच्या नवीन नोकरीसाठी टोकियोबाहेर जायचे होते. तत्पूर्वी तिला अशा एखाद्या व्यक्तीसोबत वेळ घालवायचा होता ज्याच्यासोबत ती रिलॅक्स होऊ शकेल. त्या व्यक्तींमध्ये तिला तिचे माजी बॉयफ्रेंड आणि मित्र नको होते. 

45 मिनिटे एकत्र घालवली

अकारीने डू-नथिंग या हॅन्डसम पुरूषाला टोकीओमधून भाड्याने घेतले. दोघांनी जवळपास 45 मिनिटे रेस्टॉरंटमध्ये एकत्र घालवले. यादरम्यान आकरी यांनी त्यांच्या आवडत्या डिशची ऑर्डर दिली आणि अनेक विषयांवर गप्पा केल्या. तिने त्या व्यक्तीसोबत तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आणि त्यांना त्यांच्या लग्नाचा फोटोही दाखवला. आकरीच्या बोलण्यावर त्या माणसाने छान प्रतिसाद दिला. तिचे कौतुक करीत तिला खुश केले. गप्पांमध्ये दोघे पोट धरून हसले.

शांत दुपारचे जेवण 

27 वर्षीय अकारी म्हणाली की, मी कोणीतरी जवळच्या व्यक्तीसोबत आहे वाटत होते. मला त्या व्यक्तीसोबत गप्पा करताना, मजा करताना कोणतेही दडपण जाणवले नाही. याउलट आम्ही भरपूर मस्ती आणि मजेशीर गप्पा केल्या. त्यानंतर दुपारी शांतपणे सोबत जेवलो.

हेही वाचा :  UAN नंबर विसरलात? माहिती करून घेण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

दक्षिण कोरिआमध्ये हा व्यवसाय खुप दिवसांपासून सुरू आहे. आपल्या समारंभामध्ये सामाजिक गरज म्हणून गर्दी दिसण्यासाठीही लोकांना भाड्याने बोलवले जाते.

एका सेशनसाठी सुमारे साडेसहा हजार

गेल्या 4 वर्षांपासून, 38 वर्षीय शोजी मोरिमोटो हे स्वतः या व्यवसायात काम करत आहेत. अशा लोकांना जपानमध्ये मोरिमोटो म्हणतात. ज्याला रेंटल-सान (Rental-San) असेही म्हणतात. मोरिमोटे एका सेशनसाठी सुमारे 6000 रुपये आकारतात.

रेंटल-सान अशा लोकांसोबत वेळ घालवतात ज्यांना आपल्या आयुष्यातील कटू आठवणी किंवा भावनिक क्षणांबद्दल तिऱ्हाहित व्यक्तीबरोबर शेअर करायच्या असतात. त्या लोकांना आठवणी आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रमंडळींना सांगायच्या नसतात. त्यामुळे त्यांना भावनिक आधार मिळतो.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …