Wrestlers Protest: पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीवीर गंगेच्या किनारी दाखल, गंगासभा म्हणते “इथे या गोष्टी करायच्या नाहीत”

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगेच्या (Ganga) किनारी दाखल झाले आहेत. कुस्तीगिरांनी आपली पदकं गंगेत फेकून देण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट (Vinesh Phogat), साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी ट्वीट करत आपण आपली पदकं विसर्जित करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ट्वीटरला (Twitter) कुस्तीगिरांनी पत्र शेअर करत ही माहिती दिली होती. जर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचा आवाज ऐकला नाही तर आम्ही पदकं गंगेत फेकून देऊ असा त्यांनी दिला होता. 

“आम्ही मेडल गंगेत विसर्जित करणार आहोत. कारण ही गंगा जितकी पवित्र मानतो, त्याच पवित्रतेने आम्ही मेहनत करत हे मेडल्स मिळवले आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 

गंगासभेचा विरोध

कुस्तीगीर पदकं विसर्जित करण्यावर ठाम असताना गंगासभा मात्र त्यांचा विरोध करणार आहे. गंगासभा हरिद्वारचे अध्यक्ष गौतम यांनी सांगितलं की, “जर कुस्तीगीरांनी पदक विसर्जित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा विरोध करु. हे गंगेचं क्षेत्र आहे. येथे लोक पूजा करण्यासाठी येतात. हे जंतर मंतर किंवा राजकीय आखाडा नाही. आम्ही त्यांचा सन्मान करतो. हवं तर ते सर्वजण गंगा आरतीत सहभागी होऊ शकतात”.

इंडिया गेटवर करणार आंदोलन

“पदक आमचा जीव, आत्मा आहे. हे पदक गंगेत विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट आपल्या त्या शहिदांची जागा आहे, ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. आम्ही त्यांच्याइतके पवित्र नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आमच्या भावना त्या सैनिकांसारख्याच आहेत,” असा इशारा त्यांनी दिला आहे. 

हेही वाचा :  व्वा रे माणुसकी; रक्तबंबाळ झालेल्या तरुणाचा मोबाईल चोरून लोक काढत राहिले सेल्फी

मात्र दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, “इंडिया गेटच्या जवळपास कोणत्याही प्रकारचं आंदोलन किंवा आमरण उपोषण करण्याची परवानगी दिली जाणार नाही”. याआधी दिल्लीच्या डीसीपी पीआरओ सुमन नलवा यांनी सोमवारी सांगितलं होतं की, “कुस्तीविरांना आता जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर त्यांना अन्य ठिकाणी आंदोलन करायचं असेल तर परवानगी घ्यावी लागेल”. 

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …