Women’s World Cup : वेस्ट इंडिजची शमिलिया कोनेल क्षेत्ररक्षण करताना मैदानावर कोसळली ; रूग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल केले | Windies cricketer Shamilia Connell collapses on field msr 87


कोनेल अचानक जमिनीवर कोसळल्याने पंचांनी सामना काही वेळासाठी थांबवला होता

महिला विश्वचषक २०२२ च्या १७ व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक धक्कादायक घटना घडली. वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कोनेल ही क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरच पडली. यानंतर तिला रुग्णवाहिकेतून मैदानाबाहेर नेण्यात आले. वेस्टइंडिज आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली.

बांगलादेशच्या डावाच्या ४७ व्या षटकात चक्कर आल्याने शमिलिया कोनेल जमिनीवर पडल्याची घटना घडली. कोनेल जमिनीवर पडल्यानंतर पंचांनी खेळ थांबवला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले.

ही घटना घडली तेव्हा सामना अत्यंत रोमांचकारी वळणावर होता. बांगलादेशच्या शेवटच्या विकेटच्या जोडीला १९ चेंडूत सामना जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करणारी कोनेल पोटाला धरून हळू हळू खाली पडताना दिसली. त्यानंतर, वैद्यकीय कर्मचारी मैदानात पोहोचेपर्यंत सहकारी खेळाडूंनी शामिलियाला सांभाळले. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला आणि वेस्ट इंडिजची कर्णधार स्टॅफनी टेलरने शेवटची विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांदरम्यान माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर आज सामना खेळला गेला. बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला ५० षटकांत ९ गडी बाद १४० धावाच करता आल्या. मात्र, हेली मॅथ्यूज, एफी फ्लेचर आणि कर्णधार स्टॅफनी टेलर यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजला छोट्या लक्ष्याचा बचाव करता आला. बांगलादेशचा संघ ४९.३ षटकांत १३६ धावांत आटोपला.

हेही वाचा :  बंजी जंपिंगचा हा थरार अंगावर काटा आणणारा, उडी मारताच तुटली दोरी आणि... पाहा व्हिडीओ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. …

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले ‘आम्ही निवडणुकांवर…’

LokSabha Election: देशातील निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवरच (EVM) होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. …