ऑफिसमधून घरी येताच पत्नीची पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video व्हायरल… घरगुती हिंसाचारावर नवीन वाद

Trending News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ विचार करायला लावणार असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओने घरगुती हिंसाचाराला (Domestic Violence) केवळ महिलाच बळी पडत नाहीत तर पुरुषांना याचा त्रास होतो अशी चर्चा सुरु झाली आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती ऑफिसमधून घरी आलेला दिसतोय. घरी आल्यावर दरवाजात तो आपल्या पायातील बूट काढतो आणि डोक्यावरील हेल्मेट काढताना दिसतोय. त्याचवेळी आतल्या रुममधून संतापाने धावत बाहेर येते आणि पतीला थेट मारहाण करायला सुरुवात करते. व्हिडिओत ही महिला त्या व्यक्तीला अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतेय. इतकी मारहाण करत असताना तो व्यक्ती मात्र निमूटपणे मारहाण सहन करताना दिसतोय. मारहाणीची ही सर्व घटनात घरातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. 

@cctvidiots या एक्स हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत एक पोस्टही लिहिण्यात आली आहे. ’14 तास काम केल्यानंतर पती ऑफिसमधून घरी येतो. तो व्यक्ती कचरा बाहेर ठेवण्यास विसरला, यामुळे नाराज झालेल्या पत्नीने त्याला अमानुष मारहाण केली’ सीसीटीव्हीतली ही घटना 29 जानेवारीची असल्याचं या फुटेजमधल्या तारखेवरुन दिसतेय. ही घटना नेमकी कोणत्या ठिकाणची आहे याचा मा्तर शोध लागलेला नाही.

हेही वाचा :  या फोटोत तुम्हाला आधी महिला दिसली की पुरुषाचा चेहरा?; उत्तरात दडलंय तुमच्या Personality चं गुपित | mind journal what you see in this picture answer will tell about your personality scsg 91

सोशल मीडियावर वाद
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 20 सेकंदाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांनी ही घरगुती हिंसेचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो असं काही जणांनी म्हटलंय. तर काही जणांनी पुरुषांनाही घरगुती हिंसाचारा सामोरं जावं लागतं, हे या व्हिडिओवरुन स्पष्ट होतं, असं काही युजर्सने म्हटलं आहे. 

घरगुती हिंसाचाराच्या घटना
घरगुती हिंसाचाराला बळी पडलेले अनेक पुरुष आपली खिल्ली उडवली जाईल या शरमेने याबाबत तक्रार दाखल करत नाहीत. एका युजरने म्हटलंय केवळ कचरा घराबाहेर ठेवला नाही म्हणून या महिलेने आपल्या पतीला इतकी मारहाण केली. तर इतर चुकांच्यावेळी ती त्याचे काय हाल करत असेल. 

केवळ कचरा बाहेर न ठेवल्यामुळे या व्यक्तील इतकी मारहाण केली का यात किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पण सीसीटीव्हीत तो पुरुष घरगुती हिंसाचाराला बळी पडलाय हे नक्की.

हेही वाचा :  पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोरSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास…; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो …