कोण आहे फरहान अख्तरची होणारी पत्नी शिबानी दांडेकर? क्रिकेटसोबत आहे खास कनेक्शन

Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर  (Farhan Akhtar) आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे  19 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाची तायरी देखील सुरू झाली आहे. शिबानी आणि फरहान यांचा मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला. शिबानी आणि फरहानच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला शिबानीची बहिण अनुषा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) हे उपस्थित होते. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की फरहानची होणारी पत्नी शिबानी ही कोण आहे? जाणून घेऊयात शिबानीबद्दल…

शिबानी दांडेकर ही गायिका आहे. तसेच तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. शिबानीनं तिच्या करिअरची सुरूवात अमेरिकेच्या एका टिव्ही शोचे सुत्रसंचालन करून केली. भारतात परत आल्यानंतर शिबानीनं हिंदी शोमध्ये आणि इव्हेंट्समध्ये सूत्रसंचालन केलं. त्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. पण 2019 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचे सूत्रसंचालन केल्यानंतर शिबानीला विशेष प्रसिद्धी मिळाली.  शिबानीनं रॉय या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने शानदार, सुल्तान आणि नूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही शिबानीची जवळची मैत्रीण आहे. 


फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट  घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 

हेही वाचा :  शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हेही वाचा :

Disha Patani : 80 किलो वजन उचलून दिशाचं वर्कआऊट; टायगरची बहिण आणि आई म्हणाली…

Madhuri Dixit : ‘हे’ गाणं पाहण्यासाठी माधुरी बुरखा घालून गेली चित्रपटगृहात ; सांगितला किस्सा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Jawan’ ते ‘आदिपुरुष’; जून महिन्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी

June 2023 Movies Release : हिंदी सिनेसृष्टीला (Bollywood) सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही …

Digambar Naik : दिगंबर नाईकचं ‘बाई वाड्यातून जा’ नवं नाटक रंगभूमीवर

Digambar Naik : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता दिगंबर नाईक (Digambar Naik) …