पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर नजर ठेवावी, स्क्रीनच्या अतिवापराचा मेंदूवर काय परिणाम होतो?

Virtual Autism : मुलांचा खेळण्याचा वेळ कमी झाला असून त्यांच्या हातात टॅबलेट किंवा सतत टीव्ही पाहिल्याने लहान वयातच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची (ASD) लक्षणे दिसून येत आहेत. अलिकडील झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार, टीव्ही, व्हिडीओ गेम, आयपॅड किंवा कॉम्प्युटरसह स्क्रीनसमोर खूप वेळ घालवणाऱ्या अनेक लहान मुलांमध्ये ऑटिझमशी (Autism) संबंधित लक्षणे आढळतात. जेव्हा पालक काही महिन्यांसाठी स्क्रीन टाईम (Screen Time) कमी करतात तेव्हा ही लक्षणे दूर होतात. हा सिंड्रोम “व्हर्च्युअल ऑटिझम” (Virtual Autism) म्हणून ओळखला जातो, किंवा ऑटिझम संगणकाच्या स्क्रीनद्वारे होतो. रोमानियातील क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ. मारियस झाम्फिर यांनी “व्हर्च्युअल ऑटिझम” या संज्ञेचा शोध लावला.

व्हर्च्युअल ऑटिझमचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक ठरते. परंतु मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक आरोग्यासाठी तसेच मुलाची ऑटिस्टिक लक्षणे, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा आभासी ऑटिझममुळे दिसून येताय की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारतात ऑटिझमचे प्रमाण वाढत असून यामुळे पालक, शाळा आणि आरोग्यसेवा व्यावसायिकही चिंताग्रस्तझाले आहेत.

पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा हल्लीच्या पिढीतील मुलांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जास्त रस दिसून येतो. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार वाढलेला स्क्रीन टाईम वेळ हा मेलेनोप्सिन-संप्रेषण करणारे न्यूरॉन्स आणि कमी झालेल्या गॅमा-अमिनोब्युटीरिक अॅसिड न्यूरोट्रान्समीटरशी संबंधित आहे, ज्यामुळे असामान्य वर्तन, मानसिक आणि भाषिक विकास कमी होतो आणि इतर समस्या येतात.

हेही वाचा :  Roadies 18 : 'रोडीज 18'मध्ये मुस्कान जटाना स्पर्धक म्हणून दिसणार

स्क्रीनच्या अतिवापराचा मेंदूवर काय परिणाम होतो?

लहान मुलांना दररोज चार किंवा त्याहून अधिक तास गॅजेट्सचा वापर करत असतील तर अशा पालकांना तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. आभासी जगात जास्त वेळ घालवल्याने लहान मुलांच्या मेंदूवर दुष्परिणाम होतो. यामुळे बोलण्यात तोतरेपणा येऊ शकतो तसेच मानसिक समस्या उद्भवू शकतात.

अतिरिक्त स्क्रीन टाईम मेंदूच्या मेलाटोनिन आणि डोपामाईनच्या उत्पादन वाढीस कारणीभूत ठरते. रात्री चांगली झोप येण्यासाठी संघर्ष करावा लागतो, लोकांशी संवाद साधताना अडचणी येतात आणि त्यांना नैराश्य आणि राग देखील येऊ शकतो. यातून निर्माण होणाऱ्या आक्रमकतेमुळे त्यांच्या नातेसंबंधांना हानी पोहोचू शकते आणि त्यांचा आत्मविश्वास, स्वाभिमानही कमी होऊ शकतो.

मुलाच्या मूलभूत विकासाच्या गरजांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी संवाद साधणे, सहानुभूती दाखवणे आणि गंभीर सामाजिक कौशल्ये आत्मसात करणे शिकले पाहिजे. पालकांनी दररोज मुलांशी संवाद साधला पाहिजे. प्री स्कूलरसाठी स्क्रीन टाईम दररोज एक तासापेक्षा जास्त नसावा. मुलांनी त्यांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त क्रियाकलापांमध्ये भाग घेतला पाहिजे. मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी त्यांना गॅजेट्सपासून दूर ठेवणे योग्य राहिल. इलेक्ट्रॉनिक स्क्रीन मीडियाच्या अत्याधिक वापरामुळे एखाद्या मुलास व्हर्च्युअल ऑटिझमची समस्या सतावू शकते.

हेही वाचा :  Sharmila Tagore : सिनेमात काम करण्यासाठी शर्मिला टागोरांनी सोडलं शिक्षण

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) अधिक सामान्य होत चालला असून अनेक संशोधनानुसार त्याचे जास्त प्रमाणात निदान केले जात आहे. मागील पिढ्यांच्या तुलनेत, आजकालची मुले इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर अधिक प्रमाणात करतात. काही संशोधनांनुसार, स्क्रीनचा वाढलेला वेळ मेलेनोप्सिन-एक्सप्रेसिंग न्यूरॉन्स आणि न्यूरोट्रांसमीटर गॅमा-अमिनोब्युटीरिक अॅसिडमध्ये (GABA) घट, ज्यामुळे असामान्य वर्तन, विकासात अडथळे इतर समस्या उद्भवतात.

– डॉ वृषाली बिचकर, बालरोगतज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …