‘…तर मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल’, शिवाली परबने मांडलं रिलेशनशिपबद्दल स्पष्ट मत

Shivali Parab On Relationship : छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार हे घराघरात पोहोचले. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून शिवाली परबला ओळखले जाते. शिवाली परबचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच शिवालीने रिलेशनशिपबद्दल तिची असणारी मतं याबद्दल भाष्य केले. 

शिवाली परब ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. तिच्या आयुष्यातील विविध घडामोडींबद्दल पोस्ट करताना दिसते. तिचे चाहतेही तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक असतात. नुकतंच शिवालीने संपूर्ण स्वराज या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने तिचे खासगी आयुष्य, हास्यजत्रेच्या गंमतीजमती, बहिणीबरोबरचं नातं आणि आई-वडील याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

“कोणत्याही रिलेशनशिपच्या पाच स्टेज”

यादरम्यान तिला तू जेव्हा तुझ्या आई-वडिलांना पाहते, त्यावेळी रिलेशनशिपबद्दल तुझं मत काय असतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, “मी जेव्हा माझ्या आई-वडिलांना पाहते, तेव्हा मला असं वाटतं की कोणत्याही रिलेशनशिपच्या पाच स्टेज असतात. तुम्ही एकमेकांना बघता आणि प्रेमात पडता, ही पहिली स्टेज असते. दुसरी स्टेज असते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या अतीप्रेमात असता. तिसरी आणि महत्त्वाची स्टेज म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल सर्व समजलेलं असतं, त्यानंतर तुमची भांडण वाढायला लागतात. तेव्हा तुम्हाला असहय्य होतं, याला कळत कसं नाही असं होतं. ही तिसरी स्टेज खूप कठीण असते. त्यानंतरची चौथी स्टेज ही त्यातून सावरणारी असते. पाचवी स्टेज अशी असते, ज्यात तुमचं रिलेशन हे यशस्वी होतं.” 

हेही वाचा :  आईविना पोर, पण मुलाने मला ओळख दिली, समीर चौगुलेंच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी

“आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही”

“त्यामुळे कोणत्याही रिलेशनशिपमध्ये तिसरी आणि चौथी स्टेज ही खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही हा मला कळलाय आणि मी याच्याबरोबर राहणार आहे, तुम्ही जेव्हा या स्टेजवर येता तेव्हा तुमचं रिलेशन हे खऱ्या अर्थाने खूप चांगलं होतं. तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप मॅच्युरिटी येते. माझ्या आई-वडिलांचं रिलेशन या पाच स्टेजमधून गेलंय, त्यांना मी भांडताना पाहिलंय, त्यांना मी प्रेम करताना पाहिलंय. त्या दोघांना जबाबदाऱ्या वाटून घेताना पाहिलंय आणि आता त्यांना कळलंय की आपल्याला एकमेकांशिवाय पर्याय नाही. तूच मला समजून घेऊ शकतो आणि मीच तुला समजून घेऊ शकते. त्याबरोबरच आता जर कोणी दुसरं आलं तर मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल, माझ्यात एवढा संयम नाही”, असेही शिवाली परबने यावेळी सांगितले. 

दरम्यान शिवाली परबने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. यावेळी शिवालीने “मी आतापर्यंत कधीही कोणाला प्रपोज केलेलं नाही. पण शाळेत असताना मला एका मुलाने प्रपोज केलं होतं. मी आता जशी बिनधास्त आहे तशी तेव्हा नव्हते. माझ्या शालेय वयात मी खूप घाबरी होते. शाळेत असताना मला एका मुलाने विचारलं होतं, पण माझ्या लाजाळू स्वभावामुळे मी त्याला काहीही प्रतिक्रिया दिली नाही.” असे तिने त्यावेळी म्हटले होते.

हेही वाचा :  बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवारSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …