‘हॉट फोटोशूट का नाही करत?’ युजरच्या प्रश्नाला विद्या बालनने दिलं उत्तर | vidya balan was asked question by user why you are not doing hot photoshoot

युजरच्या प्रश्नाला विद्या बालननं दिलेलं उत्तर सध्या बरंच चर्चेत आहे.

अभिनेत्री विद्या बालन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. पण यासोबतच ती एक कॉमेडियनही आहे. अभिनयासोबतच तिच्या सेन्स ऑफ ह्यूमरचेही अनेक चाहते आहेत. विद्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिने अलिकडेच चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी एक सेशन घेतलं होतं. ज्यात एका चाहत्यानं तिला ‘हॉट फोटोशूट का करत नाही?’ असा प्रश्न विचारला. त्यावर विद्यानं दिलेलं उत्तर खूपच चर्चेत आहे.

विद्या बालननं नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसाठी ‘Ask Me Anything’ सेशन घेतलं होतं. यावेळी तिला चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि तिनं त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. मात्र एका युजरनं तिला, ‘तू हॉट फोटोशूट का करत नाहीस?’ असा प्रश्न विचारला. युजरच्या या प्रश्नावर विद्यानं मजेदार उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘उन्हाळा सुरू झाला आहे आणि मी फोटोशूट करत आहे. मग झालं ना हॉट फोटोशूट’ विद्यानं धम्माल उत्तर देत या युजरची बोलती बंद केली. त्यामुळे तिच्या सेन्स ऑफ ह्यूमरचं कौतुक केलं जात आहे.

आणखी वाचा- The Kashmir Files मुळे कपिल शर्मा पुन्हा वादात, व्हिडीओ अर्धवट असल्याचा अनुपम खेर यांचा आरोप

विद्या बालनला या सेशनमध्ये एका युजरनं तिचं वय विचारलं. त्यावर उत्तर देताना मजेदार अंदाजात विद्यानं त्याला, ‘गुगल कर’ असं उत्तर दिलं. विद्याच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘जलसा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट येत्या १८ मार्चला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री शेफाली शहा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

हेही वाचा :  जाणून घ्या विद्या बालनच्या संपत्तीबाबतSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …