Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन शब्दांचा उल्लेख केला जातो. शालेय जीवनापासून ही फोड प्रत्येकाच्याच मनात घर करून राहिली आहे. अशा या आईचं प्रत्येक रुप हे नि:स्वार्थी असतं. जेव्हाजेव्हा बाळाचा प्रश्न येतो, तेव्हातेव्हा अगदी संकटाच्या प्रसंगीसुद्धा बाळाला मायेच्या पदराखासी सुरक्षित ठेवत ही माय स्वत: संकटांना सामोरी जाते. अशा या आईचं एक सुरेख आणि तितकंच भावनिक रुप काही दिवसांपूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून समोर आलं. 

भजन गाणाऱ्या महिलेला पाहून अनेकजण भावूक… 

सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ कित्येकदा असे काही मनात घर करतात, की ते पाहताना नकळत डोळे पाणावतात किंवा मनात भावनांची कालवाकालव होते. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अनेकांनी या व्हिडीओला ‘निस्सिम प्रेमाचं उदाहरण…’ असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ आहे ऑपरेशन थिएटरमध्ये असणाऱ्या एका महिलेच्या सी सेक्शन प्रसूतीदरम्यानचा. बाळाला जन्म देणारी ही महिला तिच्या सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान श्रीकृष्णाच्या नावाचा धावा करत सुरेल स्वरात एक भजन गाताना दिसत आहे. 

हेही वाचा :  MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

 

‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा…’ असं हे भजन अतिशय सुरेल आवाजात गात असतानाच या महिलेला जणू तिच्या वेदनांनचा, मनातील भीतीचा विसर पडला असून, तिला फक्त आणि फक्त बाळालाच भेटण्याची इच्छा असल्याचा आर्त भाव व्यक्त होत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेनं स्वत:वर ठेवलेला ताबा, तिची शांत मुद्रा आणि धैर्य पाहून तिथं असणाऱ्या डॉक्टरांनाही तिचं प्रचंड कौतुक वाटत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात, आला असून, अनेक नेटकरी तो वारंवार पाहत आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या निमित्तानं मातृत्त्वाप्रती आदराची भावना व्यक्त केली आहे. आई नकळतच तिच्या लेकरांसाठी खूप काही करत असते. अशा या ‘आई’पणाला सलाम!!!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून …

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. …