वाचा बाल भारती चित्रपटाचा रिव्ह्यू…

Baal Bhaarti Movie Review: ‘इंग्रजी’ म्हणलं की आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात.उभ्या आयुष्यात इंग्रजी भाषेशी छत्तीसचा आकडा असल्याना मोठी स्वप्न साकारता येत नाहीत असा विचार अनेक पालक मंडळी करतात. आपल्या मुलांना चांगल्या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकवण्यासाठीचा अट्टाहास करताना दिसतात, याचं कारण असंही आहे की मुलांना सतत आजूबाजूला इंग्रजी बोलणाऱ्यांचं वातावरण असलं की अगदी सहजपणे इंग्लिश बोलता येईल अशी समजूत असतेच, शिवाय मराठी माध्यमिक शाळेत इंग्रजी शिकवलं जातंच मात्र इतर माध्यमातील मुलांच्या तुलनेने आपली मुलं मागे पडायला नको आणि मुलांनी मोठं झाल्यावर मराठी शाळेत शिक्षण झालं आसल्यानं आमचं इंग्रजी सुधारलं नाही किंवा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही. असा ठपका भविष्यात पालकांवर मुलांनी ठेवायला नको म्हणून असलेली ओरड सर्रास आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रश्नांकडे ‘बाल भारती’ या सिनेमा मधून लेखक-दिग्दर्शक नितीन नंदन यांनी लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा :  सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...

‘बाल भारती’मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री नंदिता पाटकर, उषा नाईक, बालकलाकार आर्यन मेंघजी सोबतच रवींद्र मंकणी आणि   रॉकिंग अभिजित खांडकेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर अगदी सरळ साधी कोल्हापूरच्या मराठी कुटुंबाची गोष्ट आहे, आई नंदिता, बाबा सिद्धार्थ तर चिन्या, चिन्मय म्हणजे आर्यन आणि त्याची आज्जी, सरस्वती विद्यालयचे त्याचे शाळेचे मित्र यांच्या भोवती सिनेमाचं कथानक उलगडत जातं, वडिलांच्या स्वप्नांचा चुराडा होतो ते इंग्रजी भाषा बोलता येत नसल्याने आणि मग आक्खं कुटुंब चिन्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी वाट्टेल ते करायचे मार्ग शोधायला लागतात, यात चिन्याची शाळा सरस्वती विद्यालय चे मुख्याध्यापक यांच्या भूमिकेत रवींद्र मंकणी  खरोखरच मुख्याध्यापक म्हणून भावले, 
आपल्याला आपल्या शाळेतील असेच शिक्षक हेडमास्तर नक्की आठवतील, शाळेत चैतन्य घेऊन येणारा रॉकी म्हणजे अभिजित देखील कथानकाला गती देतो.

चिन्याचा मराठी ते इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन बाल शास्त्रज्ञ होईपर्यंतचा प्रवास म्हणजे ‘बाल भारती’

News Reels

हा सिनेमा प्रत्येक पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक मग ते मराठी असो किंवा इंग्रजी माध्यमाचे असो प्रत्येकांच्या कळकळीचा विषय म्हणजे चांगलं शिक्षण आणि सोबत मराठी संस्कृती, गमतीशीर मनाला भिडणारी गोष्ट ही पालकांच्या प्रश्नांना आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक ट्रिगर ठरणारी आहे! 

हेही वाचा :  दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया-रणबीरचा बोलबाला!

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …