1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?

Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज सर्व फूड ब्लॉगर्सला दिलं आहे. या मालकाने केलेल्या दाव्यानुसार त्याने तयार केलेलं एक स्पेशल ऑमलेट जी व्यक्ती 10 मिनिटांमध्ये खाईल तिला 50 हजार रुपयांचं बक्षिस दिलं जाईल.

कोणालाच पूर्ण करता आलं नाही हे चॅलेंज

या फूड स्टॉलच्या मालकाने हे 50 हजारांचं चीज ऑमलेट कशापद्धतीने तयार केलं जाईल याची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. ऑमलेट बनवण्याची पद्धत पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हे खास ऑमलेट खाल्ल्यानंतर ते खाणाऱ्याला पुढील 5 दिवस भूक लागणार नाही असा दावा हे ऑमलेट बनवणाऱ्याने केला आहे. आपण हे चॅलेंज सुरु केल्यापासून दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील कोणालाही हे चॅलेंज पूर्ण करता आलेलं नाही, असंही या मालकाने सांगितलं आहे. कोणालाच हे ऑमलेट 10 मिनिटांमध्ये संपवता आलेलं नाही.

हेही वाचा :  Pune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या

कसं तयार करतात हे ऑमलेट?

हे स्पेशल ऑमलेट तयार करण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल 15 अंड्यांचा वापर केला जातो. अमूल बटरचं संपूर्ण पाकिट वापरुन हे अंड तयार केलं जातं. या अंड्यामध्ये मोठ्याप्रमाणात चीज आणि पनीरबरोबरच इतर भाज्याही टाकल्या जातात. या ऑमलेटमध्ये 4 ब्रेड वापरले जातात. हे अंड तयार केल्यानंतर त्यावर पुन्हा अमूल बटरचं एक संपू्र्ण पाकिट टाकलं जातं.

या ऑमलेटची किंमत किती?

गुरुग्राममधील हुडा मार्केटमधील राजीव ऑमलेट नावाच्या दुकानात हे चॅलेंज सुरु करण्यात आलं आहे. या अंड्याची किंमत 440 रुपये आहे. म्हणजेच 440 रुपयांमध्ये 50 हजार जिंकण्याची संधी हे चॅलेंज स्वीकारणाऱ्याला मिळू शकते. या चॅलेंजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हे ऑमलेट बनवण्याची संपूर्ण प्रोसेस आणि ठरवा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज…

अनेकांनी व्यक्त केली नाराजी

एकीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी दुसरीकडे या ऑमलेटसाठी जेवढ्याप्रमाणात बटर वापरण्यात आलं आहे ते पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे ऑमलेट खाल्लं तर 50 हजारांच्या बक्षिसाबरोबर 50 हार्ट अटॅकही मोफत मिळतील, असा खोचक टोला एकाने लगावला आहे.

हेही वाचा :  प्रेयसी लग्न करत असल्याने संताप, पठ्ठ्या म्युझिक सिस्टीममध्ये बॉम्ब लपवून लग्नात पोहोचला अन् काही क्षणात...

अरोग्याला फायद्याचं नसणारे पदार्थ प्रमोट करायला नको अशी प्रतिक्रिया अन्य एकाने नोंदवली आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …