पुन्हा दिसला ‘तो’ रहस्यमयी खांब; आरशासारख्या चकाकणाऱ्या या वस्तूमुळं एकच खळबळ

पुन्हा दिसला ‘तो’ रहस्यमयी खांब; आरशासारख्या चकाकणाऱ्या या वस्तूमुळं एकच खळबळ

पुन्हा दिसला ‘तो’ रहस्यमयी खांब; आरशासारख्या चकाकणाऱ्या या वस्तूमुळं एकच खळबळ

Monolith In Las Vegas : जगाच्या पाठीवर दर दिवशी काही अशा घडामोडी घडत असतात ज्या अनेकांनाच थक्क करतात. अभ्यासक, जाणकार आणि संशोधकांच्याही चातुर्याला शह देतात. अशीच एक घटना नुकतीच अमेरिकेतील लास वेगस इथं घडली असून, इथं आढळलेल्या एका वस्तूनं नकळतच भीतीचं वातावरण तयार केलं आहे. वेगासमध्ये अचानकच एक चमचमणारा खांब दिसू लागल्यामुळं खळबळ माजली आहे. या खांबाला ‘मोनोलिथ’ असं म्हटलं जात आहे. 

हा मोनोलिथ अनेक प्रश्न चाळवत असून, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणते तो इथं आला कुठून? यापूर्वी कोरोना काळात म्हणजेच साधारण 4 वर्षांपूर्वी असाच एक खांब नजरेत आला होता. दरम्यान, यावेळी लास वेगसमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोनोलिथसंदर्भात माहिती देत काही फोटोही शेअर केले. 

बीबीसीच्या वृत्तानुसार लास वेगस शहरापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या नेवादा वाळवंटीय प्रदेशात हा मोनोलिथ आढळला.  आम्ही इथं अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत, पण ही गोष्ट फारत अनपेक्षित आणि विचित्र आहे, तुम्हीसुद्धा ती पाहिली पाहिजे, अशी सोशल मीडिया पोस्ट करत स्थानिक पोलिसांनी मोनोलिथसंदर्भातील बातमी सर्वदूर पसरवली. 

आरशासारखा लख्ख चकाणारा हा खांब इथं कुठून आला यासंदर्भातील माहिती कोणालाही नसून, आता पुन्हा एकदा मोनोलिथ आणि त्याच्या अवतीभोवती असणारे कुतूहलपूर्ण प्रश्न आणि नवनवीन सिद्धांत डोकं वर काढताना दिसत आहेत. अमेरिकेच्याच युटामधून या रहस्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं, जिथं वाळवंटामध्ये हे खांब दिसले होते. 2020 मध्ये कॅलिफोर्नियामध्येही अशाच पद्धतीचे खांब आढळले होते. 

हेही वाचा :  Naked People In Village : या गावात बायका मुलांसह सगळेच निर्वस्त्र फिरतात...अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत...

मोनोलिथ म्हणजे काय? 

तांत्रिकदृष्ट्या मोनोलिथ एक प्रकारचा दगड असून सहसा तो एखाद्या स्तंभाच्या आकारात आढळतो. असं म्हणतात की, गतकाळात ते एखाद्या खास ठिकाणी ठेवले जात होते. इतिहासकारांना अशा प्रकारचे अश्मयुगीन खडक आजवर अनेकदा सापडले आहेत. पण, हल्ली निदर्शनास येणारे हे खांब मात्र खडकाचे नसून, ते धातूचे असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय त्यांची चमक लक्ष वेधणारी ठरत आहे, ज्यामुळं हे मोनोलिथ आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहेत. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून …

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. …