महाराष्ट्राची शान असणाऱ्या पैठणीतील सायली संजीवच्या अदा!

पैठणी म्हटलं की महिलांसाठी खास जिव्हाळ्याचा विषय. पैठणीमध्येही अनेक वेगवेगळे डिझाईन्स आता पाहायला मिळत आहेत. तर अभिनेत्री सायली संजीवने केलेला गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटही सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सायली संजीवचे पैठणीतील काही लुक लक्षवेधी ठरत आहेत. तिचे पैठणीतील हे मनमोहक सौंदर्य आणि पैठणीच्या डिझाईन्स याबाबत नक्कीच उत्सुकता आहे. त्यामुळे सायलीच्या पैठणीची फॅशन नेमकी काय आहे आणि लग्नसमारंभात तुम्ही ती कशी कॅरी करू शकता याविषयी स्टाईल टिप्स.

पारंपरिक भरजरी पैठणी

पैठणी म्हटली की डोळ्यासमोर काही गडद रंग आपोआपच तरळतात. त्यातही भरजरी आणि पदरावर कोरीव काम अशी पैठणी सर्वांना आवडते. सायलीची ही पैठणी नक्कीच अप्रतिम असून कोणत्याही लग्न, मुंज अथवा सणासमारंभासाठी वापरता येऊ शकते. यामध्ये सायलीने पारंपरिकता आणि आधुनिकतेचा छान मेळ साधत स्टाईल केली आहे.

MT Fashion Tip – तुम्हाला तोचतोचपणा नको असेल तर पारंपरिक पैठणीसह स्लीव्हलेस ब्लाऊज घाला. त्यावर नथ आणि मोठे कानातले घालून तुमचा पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ असणारा लुक पूर्ण करा. साडीवर हातभर बांगड्या घालण्याचीही गरज भासणार नाही. तसंच आंबाडा न घालता यावर केस मोकळे ठेवा आणि तुमच्या लुकला अधिक आकर्षक करा.

हेही वाचा :  Sayali Sanjeev : 'गोष्ट एका पैठणीची'चं हटके प्रमोशन

पैठणीचा पारंपरिक लुक

पैठणीमध्ये काही ठराविक रंगाचा वापर केला जातो. गडद रंगाला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र आपला पारंपरिक लुक पूर्ण करण्यासाठी सायलीने इथे नेहमीचे रंग न निवडता राखाडी आणि गुलाबी रंगाच्या पैठणीची निवड केली आहे. तसंच आपला लुक अत्यंत साधा आणि तरीही आकर्षक ठेवला आहे. यामध्ये अगदी टिपीकल मराठमोळा लुक सायलीचा दिसून येतोय.

MT Fashion Tip – अशा पैठणी साडीसह तुम्ही चोकरपेक्षा पारंपरिक दागिन्यांचा वापर करावा. तसंच लग्न झाले असेल तर हिरव्या बांगड्यांनी सौंदर्यात अधिक भर पडते. त्याशिवाय ठुशी, मोहनमाळ अशा दागिन्यांचा वापर करा आणि कानात कुडी घाला. आंबाड्यावर गजरे घालून आणि कपाळावर चंद्रकोर लाऊन हा लुक पूर्ण करा. तसंच यासाठी भडक मेकअपपेक्षा मिनिमल मेकअपवर भर द्या.

(वाचा – रॉयल लुक मिळविण्यासाठी निवडा अशा कांजीवरम साडी, समारंभाचे तुम्हीच असाल मुख्य आकर्षण)

जॅकेटसह पैठणी साडी लुक

फॅशन आणि लुकमध्ये तोचतोचपणा कंटाळवाणा ठरतो. त्यामुळे पैठणीमध्येही सध्या वेगवेगळे ट्रेंड्स येत आहेत. सायलीने आपल्या लुकमध्ये बदल करून पैठणीसह जॅकेट परिधान केले आहे. बारीक निऱ्यांचा पदर आणि त्यावर निऱ्या हा लुक खूपच रॉयल वाटत असून साडीच्या रंगामुळेही सौंदर्यात भर पडली आहे.

MT Fashion Tip – तुम्हाला एखाद्या लग्नासाठी असा लुक करून जाता येऊ शकते. साडीचा पदर बारीक काढल्यास, जॅकेटची शोभा अधिक उठावदार दिसून येईल. तसंच पैठणीचा रंग भडक निवडा आणि मेकअपही थोडा ग्लॉसी करण्याकडे भर द्या. अशी स्टाईल फॉलो करताना कानातले न घालता केवळ चोकर घाला आणि आपला लुक पूर्ण करा.

हेही वाचा :  "डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं"; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे - फडणवीसांचे कौतुक

(वाचा – Bigg Boss Marathi 4: तेजस्विनी लोणारीचा जलवा, फॅशन सेन्सने केले चाहत्यांना घायाळ! खेळ आणि सौंदर्याने जिंकले मन)

कॉटन पैठणी

सायली संजीवची ही कॉटबॉलिवूडवर ब्लॅक फिवर जान्हवी, काजोल, दुलकर सलमानचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुमचाही दिवस बनून जाईलन पैठणी खूपच आकर्षक आहे. डोळ्याला शांतता देणारा रंग आणि कोणत्याही वयातील मुली अथवा महिला ही साडी व्यवस्थित सांभाळू शकतात. तुम्ही जर साडीमध्ये कम्फर्टेबल नसाल पण साडी नेसायची असेल तर अशा पद्धतीची पैठणी तुम्ही निवडू शकता. ही तुमच्या अंगाला व्यवस्थित चापूनचोपून बसवता येते आणि त्यामुळे तुम्हाला वावरायलाही सोपे जाते.

MT Fashion Tip – कॉटनची पैठणी ही सांभाळायला अत्यंत सोपी आहे. तसंच यामध्ये फिकट रंग निवडून तुम्ही भरजरी ब्लाऊज अथवा मिसमॅच ब्लाऊजचा वापर करावा. ही स्टाईल अधिक चांगली दिसते. गळ्यात काहीही न घालता बसके कानातले आणि हेअरस्टाईल केल्यास तुमचा लुक पूर्ण होऊ शकतो.

(वाचा – बॉलिवूडवर ब्लॅक फिवर जान्हवी, काजोल, दुलकर सलमानचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुमचाही दिवस बनून जाईल)

कोरीव काम असणारी पैठणी

पैठणीच्या पदरावर कोरीव काम हेच पैठणीचे वैशिष्ट्य आहे. विशेषतः यावर असणारे मोर आणि पोपट हे महिलांना अधिक आकर्षित करते. अशा पैठणींमध्ये गडद रंग हा कोणालाही आवडतो. त्यामुळे एखाद्या घरच्या लग्नासाठी अथवा कार्यक्रमासाठी तुम्ही सायलीच्या या अशा पद्धतीच्या पैठणीची निवड नक्कीच करू शकता.

हेही वाचा :  डायबिटीस रुग्णांना इन्शुलिनची कधी गरज भासते? वयानुसार किती असावे इन्शुलिनचे प्रमाण

MT Fashion Tip – तुम्हाला अगदी पारंपरिक वेशभूषा आणि पैठणीचाच फील हवा असेल तर अशा स्वरूपाची साडी निवडा. यासह तुम्ही पारंपरिक दागिने परिधान करा आणि मेकअपवर जास्त भर द्या.

कोणत्याही कार्यक्रमासाठी सायली संजीवच्या या पैठणी लुकचा आधार तुम्ही नक्कीच घेऊ शकता. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात पैठणीला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि तिच्या आयुष्यातही ‘पैठणीची गोष्ट’ घडलेली असतेच.

(फोटो क्रेडिटः Instagram)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला…

सागर गायकवाड, झी मीडिया  Nashik News Today:  शहरात मोक्याच्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी वा बंगला असेल …

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …