कर्मचार्यांना दिलेल्या अंतर्गत नोटमध्ये, जेसीने सांगितले की अॅमेझॉनने त्यांच्या डिव्हाइसेस आणि बुक्स विभागातील कर्मचाऱ्यांना कपातीबद्दल माहिती दिली आहे. अॅमेझॉनमधील खर्च कपातीच्या दृष्टीने कर्मचार्यांची मोठ्या प्रमाणावर कपात सुरू आहे. अँडी जेसी हे गेल्या दीड वर्षांपासून अॅमेझॉनचे सीईओ म्हणून काम करत आहेत आणि कोरोनाच्या काळात आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागल्याचे ते सांगतात.
अॅमेझॉनने कॅलिफोर्नियातील अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने राज्यातील सुमारे २६० कॉर्पोरेट कर्मचार्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती दिली आहे. तथापि, कंपनीने अद्याप त्यांच्या कॉर्पोरेट कर्मचार्यांमध्ये नेमक्या किती कर्मचारी नियुक्ती केली याची संपूर्ण माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
अॅमेझॉनच्या आधी फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा, ट्विटर आणि इतर टेक दिग्गजांनीही खर्चात कपात, तोटा कमी करणे आणि इतर अनेक कारणांमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या जागतिक आर्थिक मंदीमुळे टेक कंपन्यांमधील कपात देखील वाढत आहे.