The Kashmir Files च्या नावाखाली होतेय आर्थिक फसवणूक; तुम्हीही बळी पडण्याआधीच सावध व्हा! | beware of the fraud via whatsapp in the name of The kashmir files – vsk 98


‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार घेत आहेत.

The Kashmir Files नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. पण सायबर गुन्हेगार देखील याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. चित्रपटाच्या नावावर लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनीच सावध राहणं भाग आहे.

नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी ‘द काश्मीर फाइल्स’शी संबंधित व्हॉट्सअप स्कॅमबद्दल मोबाईल युजर्सला महत्त्वाची सूचना दिली आहे. या सिनेमाच्या नावाखाली कोणतीही लिंक आली तर ती ओपन करु नका, अशी सूचना त्यांनी दिली आहे. या चित्रपटाच्या नावावर फसवणूक होत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. द काश्मीर फाइल्स पाहण्यासाठी लोकांमध्ये असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअपवर चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवली आहे.

एखाद्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर या लिंकवर क्लिक करताच, फसवणूक करणाऱ्यांना वापरकर्त्याच्या फोनची माहिती मिळते आणि ते सहजपणे त्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती चोरतात. रणविजय सिंह यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. फसवणूक करणारे लोक व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवतात आणि या लिंकसोबत एक मेसेज असतो ज्यामध्ये म्हटले आहे की लोक लिंकवर क्लिक करून काश्मीर फाइल्स चित्रपट विनामूल्य डाउनलोड करू शकतात. कोणताही वापरकर्ता लिंकवर क्लिक करताच, मालवेअर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये जातो.

हेही वाचा :  "बटाटे-टोमॅटोचे दर सांभाळण्यासाठी राजकारणात आलेलो नाही"; विरोधकांच्या टीकेवरुन इम्रान खान संतापले| Didnt join politics to check prices of aloo tamatar says Pakistan PM Imran Khan- vsk 98

मालवेअर नंतर वापरकर्त्याचे बँकिंग तपशील चोरण्याचे काम करते. रणविजय सिंह यांनी स्मार्टफोन वापरणाऱ्यांना सल्ला दिला आहे की, व्हॉट्सअपवर अशी कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रणविजय सिंह यांनी सांगितले की, २४ तासांत तिघाजणांनी सायबर फसवणुकीची तक्रार केली आहे. या तिघांची मिळून एकूण ३० लाखांची फसवणूक झाली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …