The Kashmir Files: जर तुमच्या भावाची हत्या आणि बहिणीवर बलात्कार झाला असता तर…; विवेक अग्निहोत्रींनी मांडलं स्पष्ट मत | The Kashmir Files Director Vivek Agnihotri says Had your brother been killed you wouldnt have bothered about data on casualties sgy 87


विवेक अग्निहोत्री यांनी दहशतवादाला विविध दृष्टीकोन नाहीत असं म्हटलं आहे

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहेत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी कामगिरी करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. या चित्रपटातून गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित करण्यात आलेल्या इतिहासावर भाष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी इंडिया टुडेशी बोलताना दहशतवादाला विविध दृष्टीकोन नाहीत असं म्हटलं आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ सारखा थेट भाष्य करणारा चित्रपट तयार करुन तुम्ही व्यावसायिक आत्महत्या केली आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा चित्रपट माणुसकी आणि शिक्षणाबद्दल आहे. जर तुम्हाला भारतामध्ये बदल व्हावेत अशी अपेक्षा असेल तर त्याचा आदर करा आणि आकड्यांच्या खेळात अडकू नका”.

‘काश्मीर फाइल्स’च्या बदनामीचा कट – मोदी

“ते (हत्या झालेले लोक) फक्त क्रमांक नाहीत. ती माणसं आहेत. कोणीही स्टीव्हन स्पीलबर्ग (शिंडलर्स लिस्टचे दिग्दर्शक) यांना होलोकॉस्टच्या डेटासाठी विचारले नाही आणि होलोकॉस्ट ही आतापर्यंतची सर्वात अमानवी आणि सर्वात क्रूर गोष्ट आहे हे मान्य केले,” असंही विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं.

हेही वाचा :  ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यावर कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा, म्हणाली "...त्यांची वेळ आता संपली" | Kangana Ranaut criticises Bollywood pin drop silence on The Kashmir Files Chamche are in shock nrp 97

“जर तुमचे पालक मारले गेले असते तर तुम्ही ४००० लोकांची हत्या झाली की ४०० याची चिंता केली नसती. जर तुमच्या भावाची हत्या झाली असती किंवा बहिणीवर बलात्कार झाला असता तर तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यात यामध्ये वेगळा दृष्टीकोन आहे का असं विचारणार नाही,” असंही ते म्हणाले.

‘काश्मीर फाइल्स’च्या बदनामीचा कट – मोदी

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये करमुक्त झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या वादावर मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिप्पणी केली. ‘सातत्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा घेऊन उभी असलेली टोळी या चित्रपटाची बदनामी करत आहे’, असा आरोप मोदींनी केला.

काश्मीर खोऱ्यमतून १९९०मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा भाजपच्या अजेंडय़ावरही राहिलेला आहे. या चित्रपटावर काँग्रेसने तसेच, काही सिनेमा परीक्षकांनी प्रतिकुल मते व्यक्त केली आहेत. या विरोधाचा संदर्भ देत, मोदींनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या चित्रपटाचे समर्थन केले.

‘हा चित्रपट काश्मिरी पंडितांबाबत कित्येक वर्षे जाणीपूर्वक दडवून ठेवलेले सत्य मांडतो. मात्र, या चित्रपटाची बदनामी केली जात आहे. एखाद्याला हा चित्रपट आवडला नसेल तर त्याला प्रत्युत्तर देणारा वा प्रतिवाद करणारा चित्रपट निर्माण करावा’, असे मत मोदी यांनी भाजपच्या खासदारांसमोर मांडले.

हेही वाचा :  'द कश्मीर फाइल्स'नं दादासाहेब फाळके पुरस्कार पटकावल्यानंतर प्रकाश राज यांचे ट्वीट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्ट आता यापुढे व्हॉट्सअपवर केससंबंधी मेसेज पाठवणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही …

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …