‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर म्हणतात, ‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा…’

The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakrborty), चिन्मय मांडलेकर (Chinamay mandlekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. देशभरातून या चित्रपटाचे जोरदार कौतुक होत आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित चित्रपट आहे. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले देखील पाहायला मिळाले.

एकीकडे देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडे अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे. सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळाले. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी देखील या वादावर भाष्य केलं आहे. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अ‍ॅपच्या लॉंचिंगवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

इथल्या हिंदू-मुस्लिमांनी एकत्रच राहावे!

या कार्यक्रमाच्या वेळी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन समाज माध्यमांत जे गट पडले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. यात जर गट पडत असतील, ते ते चुकीचं आहे. गट पडण्याची गरजच नाही. अजून मी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी सविस्तर मला बोलता येणार नाही. चित्रपट जर पाहिला असता, तर मला बोलता आलं असतं. मात्र, एखाद्या चित्रपटाबद्दल अशी काँट्रोव्हर्सी होणं हे बरं नाही.’

हेही वाचा :  विमानतळावरच समंथाचा ‘Halamithi Habibo’ गाण्यावर ठेका! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!

चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा!

‘चित्रपटाविषयी तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाहीये. ही तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. कारण सगळे छान सलोख्याने राहत असताना, त्यांच्यामध्ये बिब्बा घालायची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो चित्रपटासारखाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. यावरून गट निर्माण होणं साहजिक आहे. पण, म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणं हे काही योग्य नाही’, असे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …