‘दिल से बुरा लगता है’ फेम देवराज पटेलचा अपघातात मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक!

Dil Se Bura Lagta Hai, Devraj Patel: छत्तीसगडमधील प्रसिद्ध यूट्यूब कॉमेडियन देवराज पटेल (Devraj Patel) याचा आज लभंडीजवळ एका रस्ता अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. अनियंत्रित भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात युट्यूबर देवराज पटेल याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना रायपूरच्या तेलीबंधा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. अवघ्या 21 व्या वर्षी देवराज पटेलने आपले प्राण गमावले आहेत.

भूपेश बघेल यांचं ट्विट 

‘दिल से बुरा लगता है’ या चित्रपटाने करोडो लोकांमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेला. या तरुण वयात आश्चर्यकारक प्रतिभा गमावणं खूप दुःखदायक आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती, असं ट्विट  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.

देवराज पटेल याचे मीम संपूर्ण भारतात व्हायरल झाले होते. त्यानंतर तो बीबी के वाईन्स फेम भुवन बामसह ढिंढोरा या वेब सिरीजमध्ये देखील झळकला होता. सध्या को बीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र, अचानक रोड अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसल्याचं दिसतंय. देवराजचे इंस्टाग्रामवर तब्बल ५५ हजार फॉलोवर्स आहेत. दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत चालली होती.

हेही वाचा :  सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'या' दिवशी थिएटरमध्ये 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

पाहा शेवटचा Video

दरम्यान, देवराज पटेलचा शेवटचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. लेकिन दोस्तो मे क्युट हूँ, असं कॅप्शन देत त्याने शेवटचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी त्याने केलेला टाटा गुड बाय हा चाहत्यांसाठी शेवटचा ठरलाय. छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत एक मी आणि एक म्हणजे आमचे काका, असं म्हणत देवराजने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्याची लोकप्रियता तुफान वाढली होती.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

व्यवस्थित Zoom करून पाहा; अवकाशातून असा दिसतो ‘राम सेतू’… समोर आला पहिला स्पष्ट फोटो अन् नवी माहिती

Ram Setu high resolution photo : राम सेतू… भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा …

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …