मराठा आरक्षणबाबत केंद्रात बिल मंजूर करा ; राजकीय चिखलफेक चुकीची – उपमुख्यमंत्री अजित पवार


अलिबाग  : मराठा आरक्षणबाबत केंद्राने पार्लमेंटमध्ये बिल पास करण्यासाठी आग्रह धरावा, मात्र आंदोलन न करता मार्ग काढावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांना केले होते. राज्याच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आम्ही सोडवू, मात्र राज्यातील अखत्यारीत नसलेले प्रश्न सोडविणे कठीण आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्याचबरोबर दिशा सलियन प्रकरण, राजकीय चिखलफेक, ईडी आणि किरीट सोमय्या या विषयांवरही आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

रोहा नगर परिषदेच्या माध्यमातून डॉ. सी. डी. देशमुख यांच्या नावाने अद्ययावत शहर सभागृह उभारले जात आहे. २२ कोटी खर्च करून हे ८०० आसन व्यवस्था, ई लायब्ररी, सभागृह, अभ्यासिका, मीटिंग हॉल, सोलर सिस्टम असे अद्यावत सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी निधी नगर परिषदेकडे  वर्ग करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे उपस्थित होते.

  डॉ. सी. डी. देशमुख यांच्या नावाला शोभेल असे सभागृह तयार करा. यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांना बगिच्याची आवड होती. त्यामुळे रोह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची बाग डॉ. सी. डी. देशमुख यांच्या नावाने उभारा यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही पवार यांनी दिले आहे.

हेही वाचा :  हातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

राजकीय चिखलफेक ही आपली परंपरा नाही

राज्यात सध्या एकमेकांवर खालच्या भाषेत चिखलफेक होत आहे हे आपल्या परंपरेला साजेसे नाही. हे मला अजिबात पटलेले नाही. शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात एकमेकांवर टीकाटिपण्णी होत होती. मात्र तरीही त्यांच्यात मैत्रीचे संबंध रूढ होते. मात्र राज्यात सुरू असलेली ही चिखलफेक योग्य नाही. जे एकमेकांवर आरोप करणाऱ्या नेत्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

सूडबुद्धी नको

राज्यात ईडीचे सत्र सुरू असताना सुडाचे राजकारण सुरू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. जे काही आहे ते नियमाने झाले पाहिजे सूडबुद्धीने राजकारण करू नका, असे पवार यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्यांबाबत बोलताना कोणी कोणाची नावे घ्यावीत तो ज्याचात्याचा प्रश्न आहे. मात्र काळ आणि वेळ ही सर्वाची येत असते हे लवकरच कळेल. दिशा सलियनबाबत नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबाबत बोलताना कोणी काही तक्रारी करायच्या हा प्रक्रियेचा भाग आहे, तथ्य असेल तर कारवाई होईल.

The post मराठा आरक्षणबाबत केंद्रात बिल मंजूर करा ; राजकीय चिखलफेक चुकीची – उपमुख्यमंत्री अजित पवार appeared first on Loksatta.

हेही वाचा :  फ्रिज, एसी, सोफा अन्... मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी 'व्हॅनिटी व्हॅन'

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …