अभिनेत्यानं शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, ‘काही सेकंद आणि काही इंच.

Vishal K Reddy: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी (Vishal K Reddy) हा सध्या एका घटनेमुळे चर्चेत आहे. विशालनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे. विशालनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विशालनं शेअर केला व्हिडीओ: 

विशाल कृष्ण रेड्डी यानं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना चित्रपटाच्या सेटवरील एका ट्रकचा ताबा सुटला. तो ट्रक विशालच्या अगदी जवळून गेला. हा व्हिडीओ ट्विटरवर  शेअर करुन विशालनं लिहिलं, ‘फक्त काही सेकंद आणि काही इंचाच्या अंतरामुळे मी वाचलो. मी देवाचे आभार मानतो. या घटनेमुळे मी सुन्न झालो होतो. आता मी ठिक आहे. शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे.’ विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या सेटवरील ज्युनिअर आर्टिस्ट देखील दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ: 

विशालनं शेअर केलेला व्हिडीओ आतापर्यंत 2.7 मिलियन नेटकऱ्यांनी पाहिला आहे. या व्हिडीओला अनेक युझर्सनं कमेंट्स देखील केल्या आहेत. ‘विशाल, काळजी घे’, अशी कमेंट विशालनं एका नेटकऱ्यानं विशालनं शेअर केलेल्या व्हिडीओला केली आहे. ‘मार्क अँटनी’ या चित्रपटामध्ये विशालसोबतच रितु वर्मा, अभिनय आणि एसजे सूर्या या कलाकारांनी देखील काम करणार आहेत. रविचंद्रन  हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. 

हेही वाचा :  Anand Mahindra यांचा 'नाटू नाटू' गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

विशाल हा अनेक चित्रपटांमधून आणि शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यानं चेल्लामे, सत्यम, समर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. सन नाम ओरुवर हा शो त्यानं होस्ट केला होता. आता तो ‘मार्क अँटनी’  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Maanvi Gagroo Kumar Varun Wedding: ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ फेम अभिनेत्री मानवी गागरू आणि कॉमेडियन कुमार वरुणनं बांधली लग्नगाठ; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटोSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …