‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरणी तुकाराम सुपे यांच्यासह १५ जणांवर आरोपपत्र | Charge sheet against TET malpractice case amy 95


सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार ९९५ पानी आहे.

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक, सनदी अधिकारी सुशील खोडवेकर, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह १५ आरोपींवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले.

सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार ९९५ पानी आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने आणि कागदपत्रांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला असल्याचे सायबर पोलिसांनी न्यायालयात सांगितले.  सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर, तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, दलाल अंकुश हरकळ, संतोष हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, सुनील घोलप, मनोज डोंगरे, सुरजित पाटील, स्वप्नील पाटील, राजेंद्र साळुंके, मुकुंदा सूर्यवंशी यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

 दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनदी अधिकारी, शिक्षण परिषदेचे आयुक्त, तांत्रिक सल्लागार, शिकवणीचालक, दलाल आदींचा समावेश आहे. आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत सायबर पोलिसांकडे इलेक्ट्रॉनिक तसेच कागदोपत्री पुरावे आहेत, अशी माहिती सहायक सरकारी वकील अॅगड. विजयसिंह जाधव यांनी दिली.

हेही वाचा :  Miraj Bandh News : मिरजमध्ये तणाव; बंदला मोठा प्रतिसाद, पाडकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं ‘जय श्री राम’, शिक्षकाने केलं पास.. विद्यापिठाकडून कारवाई

Trending News : उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर इथल्या वीर बहाद्दूर सिंह पूर्वांचल युनिव्हर्सिटीतल्या उत्तर पत्रिका तपासणीतल्या …