तापमानाचा कहर! झाडांवरुन फळांप्रमाणे खाली पडतायत माकडं; आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू, राष्ट्रपतींनी घेतला ‘हा’ निर्णय

सध्या संपूर्ण जगभरात तापमानाने कहर केला आहे. वाढलेल्या तापमानामुळे फक्त माणूसच नाही तर प्राणी आणि पक्षीही हैराण झाले आहेत. उष्मघातामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण उष्मघातामुळे जीव गमावणाऱ्यांमध्ये फक्त माणूस नाही तर प्राण्यांचाही समावेश आहे. मेक्सिकोतील दक्षिणपूर्व परिसरात असणाऱ्या कोलमकाल्कोमधीसल जंगलात हॉऊलर माकडं उष्मघातामुळे ठार होत आहेत. मेक्सिकोत भयानक गर्मी आणि तापमान आहे. 

हॉऊलर माकड ही मेक्सिकोमधील माकडांची एक दुर्मिळ प्रजाती आहे. सध्या वाढलेलं तापमान आणि मागील अनेक काळापासून पडलेल्या दुष्काळामुळे माकडांची स्थिती फार खराब आहे. संपूर्ण देशात सध्या भयानक उकाडा सहन करावा लागत आहे. या आठवड्यात तबास्को राज्यातील तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं होतं. यामुळे आतापर्यंत 85 हॉउलर माकडांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 17 मार्चपासून ते 11 मेपर्यंत 26 लोकांनी उष्मघातामुळे प्राण गमावले आहेत.

तबास्को सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने डिहायड्रेशनमुळे माकडांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. तबास्को राज्यातील तीन महापालिकांनी माकडांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. कोमलकाल्को जंगलात सर्वात जास्त माकडांचा मृत्यू झाला आहे. वन विभागातील कर्मचारी सध्या सर्व माकडांचे मृतदेह गोळा करत आहेत.

हेही वाचा :  Maharastra Politics : "लोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर...", रोहित पवारांचा निशाणा कोणावर?

माकडांना वाचवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून ठिकठिकाणी पाण्याची मोठे टब आणि फळांची व्यवस्था केली आहे. जेणेकरुन पाणी आणि अन्नाच्या कमतरतेमुळे माकडांचा मृत्यू होऊ नये. मैंटल्ड हाऊलर माकडाचा समावेश इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये कऱण्यात आला आहे. 

राष्ट्रपतीकडून कडक पावलं उचलण्याचा आदेश

मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्यूअल लोपेज आब्राडोर हेदेखील तबास्को राज्यातील आहेत. सध्या तापमान प्रचंड वाढलं असून, मी सतत राज्यांचा दौरा करत आहे. याआधीच कधीच मी इतका उकाडा सहन केलेला नाही. माकडांच्या मृत्यूमुळे मला दु:ख झालं आहे. माकडांचा मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यवस्था उभारण्याची गरज आहे असं राष्ट्रपती म्हणाले आहेत.

मेक्सिकोच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे की, आम्ही तापमान, दुष्काळ, डिहायड्रेशन, कुपोषण आणि पिकांवरील विषारी केमिकल फवारणीवर लक्ष ठेवत आहोत. जेणेकरुन माकडांचा मृत्यू होऊ नये. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …