टी20 विजयानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज,वन डे सामन्यांची सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs NZ OD Series : भारत आणि न्यूझीलंड (IND vs  NZ) यांच्यात टी20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उद्या अर्थात 25 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. शुक्रवारी, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ऑकलंड येथे होणार आहे. या सामन्याद्वारे भारत 2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीचा सराव सुरु करेल.  

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेचा विचार केला तर मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर तिसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला पण अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार सामना अनिर्णीत सुटला आणि 1-0 अशा फरकाने भारताने मालिका जिंकली. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

News Reels







सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर ऑकलँड
दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर हेमिल्टन
तिसरा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर क्राइस्टचर्च

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

कधी, कुठे पाहू शकता सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसी सामने टी20 सामन्यांप्रमाणे पाहता येणार असल्याने या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 

हे देखील वाचा-



Source link

हेही वाचा :  INDW vs SAW Final : टीम इंडियाचा डाव आटोपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 110 धावाचं आव्हान

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …