ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; स्टार ऑलराऊंडर बाहेर

IND W vs AUS W: महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरुद्ध (India Women vs Australia Women) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. येत्या 11 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) ही मालिका खेळणार नाही. त्याचबरोबर ऑलराऊंडर स्नेह राणालाही संघातून वगळण्यात आलंय. हरलीन देओल आणि यष्टिका भाटिया संघात पुनरागमन करत आहेत. या दोघांना इंग्लंडविरुद्धची मालिका आणि आशिया चषकातून वगळण्यात आलं होतं. महिला टी-20 विश्वचषक 2023 च्या फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी 18 नोव्हेंबरला भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील टी-20 मालिकेबाबत घोषणा केली होती. “भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका 11 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यातील पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर खेळले जातील. तर, उर्वरीत तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडतील”, अशी माहिती जय शाह यांनी दिली होती.

हेही वाचा :  दुसऱ्या कसोटीत विजयाचे शिल्पकार अश्विन-अय्यरने खास विक्रमही केला नावावर, वाचा सविस्तर

ट्वीट-

 

ट्वीट-

 

भारतीय संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल.

नेट बॉलर- मोनिका पटेल, मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर

हे देखील वाचा-

Vijay Hazare Trophy 2022 Final: ऋतुराज गायकवाडचं आणखी एक शतक; महाराष्ट्राचं सौराष्ट्रासमोर 249 धावांचं आव्हान

हेही वाचा :  सुर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 31 चेंडूत ठोकल्या 65 धावा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …