चहाप्रेमींच्या भावनांशी खेळ! चहात सफरचंद, अंड फोडून टाकलं, VIDEO पाहून तुमचंही डोकं फिरेल

Viral Video Of Raw Egg And Apple Tea: देशभरातील लोकांचे आवडते पेय म्हणजे चहा. अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरूवात चहापासून करतात. तर, असेही काही जण आहेत ज्यांना वेळेत चहा नाही मिळाला तर काहीही करु शकतात. चहाप्रेमी प्रत्येक घरात एक तरी असतोच. आत्तापर्यंत तुम्ही चहामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार बघितले असतील. ब्लॅकटी, ग्रीन टी, दुधाचा चहा, मसाला चहा, गुळाचा चहा, हे तर अनेकांचे आवडते आहेत. मात्र, चहाप्रेमींची वाढती मागणी बघून मोठं मोठे कॅफेही सुरू झाले आहेत. तसंच, चहासोबत वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. असाच एक भयंकर प्रयोग चहावर केला गेला आहे. ते पाहून नेटकरी भलतेच वैतागले आहेत. (Tea Made With Raw Egg And Apple)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात चहावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. चहात अंड व सफरचंदाचे तुकडे (Raw Egg in Tea) टाकून चहाची एक वेगळीच रेसिपी बनवण्यात आली आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओवर कमेंट करुन नेटकऱ्यांनी चहाच्या या रेसिपीवरुन टीका केली आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक महिला चहा बनवत आहे. सगळ्यात पहिले तिने तिने एक भांडे घेतले त्यानंतर त्यात चहा पावडर आणि साखर टाकून ते एकजीव करुन घेतले. नंतर यात सफरचंदाचे तुकडे टाकले नंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव केले. साखर विरघळायला लागल्यानंतर त्यात दूध टाकले त्यानंतर त्यात एक चमचा कंन्डेस्ड मिल्क टाकण्यात आले. चहाला उकळी आल्यानंतर त्यात चमच्याच्या मदतीने अंड फोडून टाकले आहे. 

हेही वाचा :  ...म्हणूनच भाजपाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पाडले; ठाकरे गटाचा दावा

चहा उकळल्यानंतर कपात गाळून घेतल्यानंतर एक स्टिकवर अंड लावून सर्व्ह करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्यूबवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक चहाप्रेमींचा मूडच खराब झाला आहे. चहासोबत होत असलेले हे भयंकर प्रयोग पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

माशाचा चहा 

 काही दिवसांपूर्वीदेखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात एका महिलेने माशाचा चहा बनवला होता. (Bengali Woman Fish Tea Recipe) चहा उकळत असताना महिलेने त्यात माशाचा एक तुकडा टाकला. मासा चांगल्या पद्धतीने शिजल्यानंतर कपात ओतून चहा पिण्यासाठी दिला होता. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर

India Politics : अखेरीस गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत प्रतिनिधीत्व करतील. यातील दोन जागा असतील …

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …