Tag Archives: Nawab Malik in JJ hospital

संजय राऊत भेटीदरम्यान काय म्हणाले? कप्तान मलिक म्हणतात, “त्यांनी सांगितलं की घाबरुन…”

सकाळी दहाच्या सुमारास संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घरी जाऊन भेट घेतली. मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२२ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर कालच मलिक यांची ईडीची कोठडी सात तारखेपर्यंत वाढवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर …

Read More »

“राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म, नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो…”; भाजपा आमदाराचा तोल सुटला

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी (२३ फेब्रुवारी २०२२) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कालपासूनच राज्यभरामध्ये भाजपा नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी तर महाविकास आघाडीतील पक्ष या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. राजीनाम्याबरोबरच नवाब मलिक यांच्याविरोधात दाऊदशी व्यवहार केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा …

Read More »

“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यामध्ये गांधी पुतळा येथे भाजपाविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतानाच अनिल गोटे यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधालाय. सोमय्या यांनी ‘डर्टी १२’ नावाने नेत्यांच्या यादीबद्दल मागील काही दिवसांपासून अनेकदा वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गोटेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. …

Read More »

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर… आधी दाऊदच्या भावाला अटक…दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक …

Read More »

नवाब मलिकांच्या अटकेची बातमी कळताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; पाच मिनिटांच्या चर्चेत म्हणाल्या….

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याबाहेरही हे प्रकरण पोहोचल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी शरद पवार यांना फोन करत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी …

Read More »

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर …

Read More »

Video : भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील मंत्री… असा आहे नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

राज्याच्या कॅबिनेटमध्ये अल्पसंख्यांक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील …

Read More »