Tag Archives: mumbai-politics

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, “एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण…”

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासहीत काही राष्ट्रवादी आमदारांनी मागील रविवारी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘चिखल करुन ठेवलाय’ असं म्हटलं होतं. दरम्यान अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अन्य 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमधील …

Read More »

…तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपणच काँग्रेसचे मुख्यमंत्री झालो असतो असं विधान केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेसंदर्भात भुजबळ बोलत होते. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी तुम्हाला पुन्हा संधी दिली असं असताना तुमच्यावर अत्याचार झालं असं तुम्ही कसं म्हणून …

Read More »

Ajit Pawar Speach: 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…

Maharashtra Politics Ajit Pawar Speach: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता टीका केली आहे. एमईटी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केलेल्या जाहीर भाषणामध्ये अजित पवारांनी 2004 साली पक्षाकडे मुख्यमंत्रीपद चालून आलेलं असताना वरिष्ठ नेत्यांनी ती संधी न घेता चार मंत्रीपद अतिरिक्त घेतली. मात्र तेव्हा संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच …

Read More »

‘जो आमच्याशी नडला…’; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी ‘या’ व्यक्तीकडे

Maharashtra Political Crisis : जुलै महिन्याची सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फारशी समाधानकारक राहिली नाही. राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळं (Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा नव्यानं पक्षबांधणीची जबाबदारी आली. (Ajit Pawar Rebel) अजित पवार यांनी 8 आमदारांच्या साथीनं पक्षात बंड करत सत्ताधारी शिंदे- फडणीवस सरकारमध्ये प्रवेश केला. रविवारीच तडकाफडकी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीला हादला दिला.  पक्षात झालेल्या या बंडाळीनंतर शरद पवारांनी …

Read More »

Maharashtra Political Crisis: “कोणी शुद्ध बुद्धीची व्यक्ती…”; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शरद पवारांनी साताऱ्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.  मी आज …

Read More »

तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले “लवकरच महाराष्ट्रात…”

Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही मागणी आता जोर धरु लागली आहे. मनसे पक्षातीलच काही नेते, पदाधिकारी यासाठी राज ठाकरेंना आवाहन करत आहेत. एकीकडे शिवसेना भवनाबाहेर यासाठी पोस्टर लावण्यात आले असताना, दुसरीकडे मनसेच्या बैठकीतही काहींनी ही मागणी केली. मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी …

Read More »

भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले “सुप्रिया सुळेही उद्या…”

Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  राज …

Read More »

“महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण…”; ‘काही सहकारी बळी पडले’ म्हणत शरद पवारांचं सूचक विधान

NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: पुतण्या अजित पवार यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर भाषणात या बंडखोरीबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय उलथापालथ करणाऱ्या घटकांना असा उल्लेख करत शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. अजित पवारांच्या बंडाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत आपल्यापैकी काही सहकारी भाजपाच्या प्रवृत्तीला बळी पडल्याचंही शरद पवार यांनी कराडमधील प्रतीसंगमावरील …

Read More »

पक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल

NCP President Sharad Pawar Full Speech: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या भाषण करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीवर सूचक पद्धतीने विधान केलं. भारतीय जनता पार्टीचा थेट उल्लेख टाकळत राज्यामध्ये मागील काही काळापासून जातीयवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी पुढील सहा महिने एका वर्षात सर्वांना जनतेसमोर जायचं असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना सूचक …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा ‘भाकरी’ची चर्चा! पण ‘भाकरी फिरवणे’चा नेमका अर्थ काय?

Bhakri Firavne Meaning In Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील काही नाराज आमदारांसहीत रविवारी (3 जुलै 2023 रोजी) राज्यातील सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, अदिती तटकरे, धनंजय मुंडेसहीत 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘भाकरी फिरवणे’ या विधानाची पुन्हा …

Read More »

अजित पवारांसह सर्व बंडखोर आमदार अपात्र? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “सर्वजण…”

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली होती. दरम्यान, आता यावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून काय कारवाई केली …

Read More »

Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना राष्ट्रीय राजकारणातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षांतर्गत बंड पुकारत भाजपा (BJP) आणि शिंदे सरकारला (Eknath Shinde) पाठिंबा दिल्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे बंगळुरुत होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधी …

Read More »

Sharad Pawar VIDEO : ‘हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं’; वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसणार आहे. आपल्यांनीच दगा दिलेला असताना ही बंडखोरी उलथून पाडत नव्यानं उभं राहण्याची वेळ पवारांवर आली.  इथंही न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत. नकळतच ज्यांनी …

Read More »

राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक

Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी रविवारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. या घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘चिखल’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली. राज ठाकरेंनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांमध्ये …

Read More »

भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारमध्ये सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांची इच्छा नसतानाही मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद तसंच शरद पवारांच्या राजीनामानाट्यापासून असलेली मनातील खदखद अखेर रविवारी बंडाच्या रुपात बाहेर पडली. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे …

Read More »

Maharashtra Politics: “शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली”

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षांतर्गंत बंड पुकारत शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) टीका करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी …

Read More »

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य मात्र राजकारणावर टीका करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं …

Read More »

अदिती तटकरे… शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

Maharashtra Politics : अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना फक्त शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रावदीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर महिला आमदाराला स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) या शिंदे फडणवीस …

Read More »

‘पहाटेचा शपथविधी’ ते ‘दुपारचा शपथविधी’… गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government:  महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या राजकीय भूकंपाला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. एका वर्षात अनेक राजकीय घडामोडी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 40 आमदारांसहीत …

Read More »

अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Ajit Pawar, Maharastra Politics:  महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घडामोड घडली आहे. शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. शिवेसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात उभी भूट पडली आहे. राषट्रवादीचे दिग्गज नेते तथा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच राष्ट्रवादीपक्ष फोडला आहे. शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  …

Read More »