Tag Archives: mumbai news

पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane News Today: ठाण्यातील कळव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन बहिणींनी मिळून एका महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीत तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाणीपुरी खाताना महिला त्यांच्याकडे बघून हसत असल्याच्या संशयातून दोघींमध्ये वाद झाले आणि त्यातूनच हत्येचा थरार घडला आहे. कळवा पोलिसांनी आरोपी रेणुका बोंद्र, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी गाडगे यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक …

Read More »

पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण…

Mumbai Crime News Today: मुंबईतील अंधेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच आरोपी पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पोलिसांनी खोटी कहाणी रचून सांगितली. मात्र कोर्टासमोर सत्य उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी गंभीररित्या होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात …

Read More »

इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो कर्मचारी बेरोजगार!

WeWork Company in Bankruptcy: ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो तर देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. देशातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या कपंनीने तसा अर्ज केला आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने …

Read More »

इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

WeWork Company in Bankruptcy:  अमेरिका, कॅनडासह भारतातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा …

Read More »

पश्चिम रेल्वेवर ‘मेगा’हाल; आता ‘या’ अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव या स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळं शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेवर लोकलच्या तब्बल 3126 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने आठवडाभराचा ब्लॉक घेण्यात आल्यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  पश्चिम रेल्वेवर दररोज सुमारे 300 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक …

Read More »

मुंबईतील ‘या’ विभागात पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम

Mumbai Water Shortage : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.   के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य …

Read More »

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल ‘या’ वेळेत धावणार

Mumbai Local Train Update:  मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.  टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि …

Read More »

मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट

Mumbai Pune Winter Weather : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते. मात्र महाराष्ट्रात हवामानाचे स्वरुप बदलत आहे. त्यामुळे यंदा कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापणान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरणार असल्याची …

Read More »

न्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : जामीनाच्या कादपत्रांवर न्यायाधिशांच्या सह्या झाल्याशिवाय आरोपींना जामीन मिळत नाही. मात्र, एका महिला वकिलाने न्यायाधीशाच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून आरोपीला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील दहिसर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.  या प्रकरणी आपल्या क्लाईंटसह न्यायव्यवस्थेलाच गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाविरोधात दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.  नेमकं काय आहे प्रकरण? हिरल जाधव असे …

Read More »

तापानंतर शरीरावर लाल रंगाचे पुरळ, सांधेदुखी; मुंबईत पसरलीये विचित्र तापाची साथ, डॉक्टर म्हणतात…

Mumbai News: हवामानात होत असलेल्या सततच्या बदल्यामुळं मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईकर सध्या तापाच्या साथीने हैराण झाले आहेत. पण तापाचा हा प्रकार काहीसा विचित्र असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर लगेचच उन्हाचे चटके जाणवायला लागले. त्यामुळं आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. साधारण सर्दी-तापाचे रुग्ण 4-5 दिवसांत ठणठणीत बरे होतात. मात्र, आता बरेच दिवस रुग्णांचा तापच निघत नाही. शरीराचे …

Read More »

मुंबईत October Heat चा कहर! मागील 10 वर्षांमध्ये केवळ तिसऱ्यांदाच असं घडलं की…; या आठवड्यातही मुंबईकरांना इशारा

Weather Update Maharashtra: ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. शनिवारी मुंबईत कमाल तापमानाने उसळी घेतली होती. शनिवारी मुंबईच्या कमाल तापमान 37 अंशापार पोहोचले होते. उन्हाच्या काहिलीमुळं अनेक नागरिक हैराण झाले होते. तर, यंदाचा ऑक्टोबर अधिक उष्ण असल्याचे भाकित हवामान विभागाने आधीच वर्तवले होते.   पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कोकण विभागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. तसंच, मुंबईच्या हवेतून आर्द्रता कमी …

Read More »

ऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार

Maharashtra Electricity Price Hike: ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 15 ते 35 पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं या महिन्यात येणारे वीज बिल वाढणार असल्याची शक्यता आहे. ऑक्टोबर हिटमध्ये उकाडा वाढू लागला आहे. वाढलेल्या तापमानामुळं अंगाची काहिली होत असताना नागरिकांकडून विजेचा वापर वाढला आहे. संपूर्ण दिवस घरातील …

Read More »

खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्…

Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील किस्से तर जगजाहिर आहेत. लोकलमधील महिलांची हाणामारी असो किंवा लोकलमध्ये साजरे करण्यात येणारे सण असो. संपूर्ण देशभरात मुंबई लोकलची चर्चा असते. मात्र, मुंबईनजीकच्या ठाण्यात लोकलमध्येच एक भयंकर प्रकार घडला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  12 ऑक्टोबर रोजी …

Read More »

ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

Mumbai News Today: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस स्थानकाच्या परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 48 तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीचे नाव ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. हल्लेखोर हा मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. (Mumbai Police News) मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री  (APAAR)’ तयार केली जात आहे.  याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज …

Read More »

मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच…

Mumbai News: शाळेत पीटीचा क्लास सुरू असतानाच एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अचानक मृत्यू ओढावला आहे. कांदिवली येथील शाळेत हा प्रकार घडला असून मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. हा शाळकरी मुलगा मुळचा गुजरातचा असून शिक्षणासाठी म्हणून तो मुंबईत आला होता. कांदिवली येथे तो हॉस्टेलमध्ये राहत होता.  मिळालेल्या माहितीनुसार, ओम सचिन गंडेचा असं या मुलाचे नाव …

Read More »

मलाबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?

Property in Mumbai: मुंबईतील उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून मलबार हिल ओळखले जाते. या भागात देशातील अनेक श्रीमंत व्यापारी व उद्योजकांची घरे आहेत. समुद्र किनारी वसलेल्या या भागात घरे घेण्यासाठी लोक करोडो-अब्जो खर्च करण्याची तयारी दर्शवतात. अशातच एका महिलेने मलाबार हिलमध्ये 3 आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. या तीन फ्लॅटची किंमत 263 कोटी इतकी आहे. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात.  …

Read More »

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Maharashtra Rain Update:  मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर …

Read More »

मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालय भाड्यानं देण्यास नकार; राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये एका मराठी महिलेचा संताप अनावर झालेला पाहायला मिळतोय. या महिलेने आणि तिच्या पतीने मुलुंड पश्चिमेला शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा पहिली होती मात्र आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही असं या सोसायटीमार्फत महिलेला सांगण्यात आलं. लेखी द्या असं या महिलेने सांगितल्यानंतर या महिलेसोबत सोसायटीच्या सचिवांनी अरेरावाची …

Read More »

मुंबईतील प्रसिद्ध हँगिग गार्डन सात वर्षांसाठी बंद?; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Mumbai Hanging Gardens: मुंबईतील उच्चभ्रू परिसरात असलेले हँगिग गार्डन हे बच्चे कंपनीचे आवडचे ठिकाण आहे. मलबार हिलमध्ये 4 हजार चौरस फुटाच्या परिसरात हे गार्डन असून त्यातील म्हातारीचा बूट हा लहान मुलांपाठोपाठ पर्यटकांचेही आकर्षण आहे. हँगिग गार्डनमधून मुंबईचा विलोभनीय नजारा दिसतो. मुंबईतील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून त्याला 136 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, आता तब्बल ७ वर्षांसाठी गार्डन बंद होण्याची शक्यता …

Read More »