Tag Archives: kitchen tips

फ्रिजमध्ये दूध ठेवल्यानं टिकत नाही, उलट खराब होतं! दचकलात ना? मग हे वाचा

How To Store Milk: दैनंदिन जीवनात आपण विद्युत उपकरणांवर किती अवलंबून असतो याचा विचार केला की या वस्तूंच भलीमोठी यादीच डोळ्यांपुढे उभी राहते. अगदी लहानसहाम कामांपासून घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत सगळीकडे या न त्या रुपात या उपकरणांची गर्दी असते. त्यातलंच एक अतिशय फायद्याचं आणि मोठ्या मदतीचं साधन म्हणजे फ्रिज अर्थात refrigerator. खाद्यपदार्थाशी संबंधित कोणतीही गोष्ट ताजी ठेवण्यासाठी, किडे- किटकांपासून वाचवण्यासाठी सहसा आपण …

Read More »

मुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Cooking Tips in Marathi : बाहेर मस्त पाऊस सुरु आहे, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी असल्याने मुलं घरी आहेत. त्यामुळे अशावेळी गरमा गरम भजी आणि मस्त चहा हा बेत तर होणारच…विकेंडचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गरमागरम, कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट भजी कशी बनावयची ते आज आम्ही सांगणार आहोत. (cooking tips hotel style crispy onion bhaji and Oil Free Bhaji Receipe video ) …

Read More »

महागाई सोसत टोमॅटो खरेदी केले खरे; आता ते खराब होऊ नयेत यासाठी वापरा ही खास ट्रिक

Tomatoes Storage Tips: टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. राज्यात एक किलो टॉमेटोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. नागपूरात तर टोमॅटोच्या दराने 200 रुपये गाठले आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या जेवणात सहज आढळणारा पदार्थ आहे. टोमॅटो नसेल तर काही पदार्थ अपूर्णही राहतात. आंबट डाळ किंवा ग्रॅव्हीची भाजी करायची झाल्यास टोमॅटोची गरज भासते.  दर वाढल्याने आता गृहिणींनी जेवणात टोमॅटो घालण्यास …

Read More »

बाजारत मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स

How to fing coriander powder is real or fake : भारतामध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये पदार्थांची चव वाढवण्यासाठी ते पदार्थ दीर्घकाळ टीकून राहावेत यासाठी काही मसाल्यांचा वापर केला जातो. पदार्थ चमचमीत करण्यासाठी ज्याप्रमाणे त्यात लाल तिखट, गरम मसाले मिसळले जातात अगदी त्याचप्रमाणे पदार्थांच्या चवीमध्ये समतोल राखण्यासाठीसुद्धा काही मसाल्यांचा वापर होतो. यातील एक म्हणजे धणे किंवा धने पूड.  सहसा गृहिणी घरीच …

Read More »

Cooking Tips : भात फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? ‘या’ टिप्स वापरुन बनवा सुटसुटीत

Kitchen Tricks and Tips in Marathi : भात करताना अनेकदा त्यामध्ये कधी पाणी जास्त झाल्याने चिकट होतो. तर भाताचा कधी गोळा होतो. असा भात वरण-आमटीसोबत ही खायला कंटाळा येतो. तर कधी भात मोकळा व्हावा असं वाटत असताना तो खूपच फडफडीत होतो पण नीट शिजत नाही. अशावेळी असा भात घशाखालीही उतरत नाही. म्हणूनच भात नीट करता येणे हे देखील स्वयंपाकातले एकप्रकारचे …

Read More »

Kitchen Cleaning Hacks : किचनमध्ये टाइल्सवर तेलाचे डाग पडलेत? मग हे उपाय करा, किचन दिसेल चकचकीत

Kitchen Cleaning Hacks best tips:  स्वयंपाकघरात काम करणे प्रत्येक स्त्रीसाठी आव्हानात्मक असते. दररोज अनेक पदार्थ स्वयंपाकघरात बनवत असतात. यामुळे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी कुकरच्या शिट्टीतून डाळ बाहेर येणे. तर कधी दुधाला उकळी येते तर कधी दूध ओटयावर सांडून डाग पडतात. अशावेळी महिलांना स्वयंपाकघरातील अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतात. पण काही उपायांनी किचनमधील डाग मिटवता …

Read More »

Kitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा ‘हे’ सोपे उपाय

Kitchen Tips in Marathi : मिठ हा अन्नाचा अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय जेवण अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे पदार्थांमध्ये मीठ नाही घातले तर जेवणाला चवच येत नाही.  पण तेच मीठ चिमूटभर तरी जेवणात टाकल तर जेवण चवदार होण्यास मदत होते. पण जेवणात मिठाचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हेच प्रमाण थोडे कमी किंवा जास्त झाले तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणजेच …

Read More »

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Causes Cancer : भारतीयांच्या ताटातील सर्वात महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणजे चपाती, फुलके किंवा भाकरी…या शिवाय त्यांचं जेवण अपूर्ण असतं. गव्हापासून तयार करण्यात येणारी पोळी कोणाकडे तेल लावून तवावर भाजली जाते. पण अनेक ठिकाणी फुलके आणि भाकरी खाण पसंत करतात. फुलके आणि भाकरी बनवत असताना अनेक जण त्या एका बाजूने तव्यावर भाजून झाल्यानंतर थेट गॅसवर भाजतात. जेव्हा ती पोळी आणि …

Read More »

Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

Parle-G Ice Cream Recipe:  उन्हाळा (Summer) सुरु झालाय, उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असतो. आईस्क्रीम, थंड पेय सर्वाना खावीशी वाटते. कडाक्याच्या उन्हात घशाला कोरड पडते आणि आपल्याला सतत थंड काहीतरी खावसं वाटतं. उन्हाळ्यात आईसक्रीम ( Ice Cream) खायची मजा काही वेगळीच असते. घरच्या घरी सोप्या पद्धतीत आईसक्रीम बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया, आणि ही आईस्क्रीम …

Read More »

दही आंबट झालंय तर फेकू नका, या पदार्थांमध्ये करा उपयोग

How To Use Sour Curd: सगळ्याच घरांमध्ये दह्याचा वापर जेवणात अथवा नुसतं खाण्यासाठीही करण्यात येतो. खाण्यात स्वाद आणण्यापासून ते डाएटमध्ये समाविष्ट करण्यापर्यंत दह्याचा वापर करण्यात येतो. पण काही वेळा दही नीट लागत नाही अथवा दही आंबट होते. मग अशावेळी दही खाता येत नाही. सारखी सारखी कढीदेखील बनविण्याचा कंटाळा येतो. मग आंबट दह्याचे नक्की काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. दही …

Read More »

Cooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात

Cooking tips and tricks :  पिझ्झा म्हटलं कि, तोंडाला पाणी सुटतं. लहान असो कि मोठे पिझ्झा खाणाऱ्यांची आणि मुख्यतः पिझ्झा प्रेमींची संख्या आपल्याकडे खूप आहे. पण बाहेर पिझ्झा खाणं आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. दरवेळी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करायचा परवड नाही आणि बाहेरच खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा आहेच .. मग अशात काय करायचं हा प्रश्न समोर असेल तर उत्तर आहे …

Read More »

घरात घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स

How To Make Curd At Home: दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. यामुळेच रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करण्यात येतो. काही जण दही घरीच तयार करतात तर अनेक जण बाजारात तयार मिळणारे दही वापरतात. अनेकांना घरात दही लावता येत नाही. मात्र तुम्हाला बाजारातील दह्याप्रमाणे घट्ट आणि गोड दही घरीच तयार करायचे असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा करा वापर. दही बनविणे तुमच्यासाठीही …

Read More »

Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे

Buttermilk Benefits : तापमानात सातत्याने वाढ होत असून, त्यातून दिलासा मिळण्याची आता आशा करायचीच नाही. कडक उन्हाळा आता सुरु झाला आहे. कडक सूर्यप्रकाश आणि घाम येणे यामुळे शरीराचे हायड्रेशन होते. त्यामुळे यावेळी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. पाण्याशिवाय तुम्ही हेल्दी ज्यूस आणि शेक देखील पिऊ शकता. यासोबतच नारळ पाणी, लस्सी आणि ताक यांसारखी नैसर्गिक …

Read More »

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे अहाहा! पर्वणीच जणू. आपल्यापैकी बरीच मंडळी आहेत ज्यांना भजी खाणं अत्यंत आवडत. बरं भजी बनवणं तास काही फार अवघड काम नाहीये. भजी बनवण्यासाठी काही ठराविक सामान लागत त्यात काही फार साहित्याची गरज भासत नाही. त्यामुळे कामी साहित्यात पटकन होणार असा हा पदार्थ. (Smart cooking tips and tricks ) लहान असो वा मोठे …

Read More »

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल.  होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा!  …

Read More »

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen Tips : स्वयंपाक करणं जितकं कठीण त्याहीपेक्षा कठीण आणि कंटाळवाणं कामं असतं ते म्हणजे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणं. एकवेळ स्वयंपाक पटकन करून होतोसुद्धा पण करपलेली खराब झालेली भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात.  किचन मध्ये काही भांडी ही रोजच्या रोज वापरली जातात, त्यामध्ये तवा हा रोज वापरला जातो.  स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी …

Read More »

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स…वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Kitchen Tips:  ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करू शकतात. त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचनमधील कामं सोप्पी होऊन जातील. या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्याला माहीतही असतील पण आपण ते वापरायला विसरतो. चला तर मग असाच काही भन्नाट आयडियाची कल्पना जाणून घेऊया आणि बनवूया स्मार्स्यं. (smart cooking tips kitchen …

Read More »

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा …

Cooking Tips : इडली खाणारे आपल्याकडे बरेच जण आहेत. सकाळच्या नाश्त्याला वाफाळता इडली खाणं म्हणजे सूख…बरं त्यात इडली म्हणजे पौष्टिक पदार्थ. तेल आणि मसाले न न वापरता इडली करणं म्हणजे सकाळी सकाळी शरीराला कोणत्याही मसाल्यांमुळे तेलामुळे होणारी हानी नाही. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने इडली म्हणजे उत्तम ब्रेकफास्ट. (how to make perfect spongy idali at home) पण बऱ्याचदा घरी इडली बनवताना ती …

Read More »

Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं…

Chapati Making Tips : चपाती बनवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण तसं अवघडसुद्धा नाही. कारण योग्य प्रमाण आणि पद्धत वापरली तर तुम्हीसुद्धा उत्तम चपात्या बनवू शकतात. टम्म फुगलेली गरमागरम गव्हाची पोळी खायला  प्रत्येकाला आवडतं. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज पेक्षा कमी नसतं. (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी इतर गोष्टींना दोष दिला जातो, …

Read More »

Smart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी

Kitchen Hacks :  आपल्या किसाचांमध्ये अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग खूप मोठ्या कामासाठी येऊ शकतो पण आपल्याला ते माहीतच नसत आणि म्हणूनच आज आपल्या घरात सर्रास उपलब्ध असणाऱ्या लिंबाच्या अश्या अनेक फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. (kitchen hacks) लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो  पण तुम्हाला माहित आहे का  लिंबाच्या सालीचे खूप उपयोग …

Read More »