Tag Archives: desh videsh News in Marathi

रशिया-युक्रेनच्या युद्धात केरळमधील कॅफेची चर्चा, युद्धाला विरोध करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा दिवस होऊन गेले आहेत. रशियातर्फे युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केला जातोय. याच भूमिकेमुळे रशियावर जगभरातून टीका केली जातेय. अमेरिका तसेच नाटोमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. केरळमधील एका कॅफेनेदेखील युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका …

Read More »

पंजाब: बीएसएफ जवानाचा साथीदारांवर गोळीबार; पाच जवान शहीद झाल्याची माहिती

गोळी झाडणाऱ्या जवानासह पाच जवान शहीद झाले आहेत. अमृतसरच्या खासा गावात एका बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) पाच जवान शहीद झाले आहे. ही घटना आज रविवारी घडली. अमृतसरमधील बीएसएफ मेसमध्ये कथित गोळीबार करणारा बीएसएफ कॉन्स्टेबल देखील मृत झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत चार बीएसएफ …

Read More »

Russia Ukraine War Live: “युक्रेनला आर्थिक पाठबळ अन् रशियाविरुद्ध…;” झेलेन्स्की यांची बायडेन यांच्याकडे मागणी

रशियाने युक्रेनमधील दोन शहरांपुरती युद्धबंदी जाहीर केली असली, तरी मारिउपोल शहराभोवती वेढा घालून असलेल्या रशियन फौजा युद्धबंदीचे पालन करत नसल्यामुळे शनिवारी नियोजित असलेले नागरिकांचे स्थलांतर लांबणीवर टाकण्यात आल्याचे या शहरातील अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.  सिटी कौन्सिलने एका निवेदनाद्वारे नागरिकांना शहरातील आश्रयस्थळी परतण्याचे आणि स्थलांतरबाबत पुढील सूचनेची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. रशिया काही भागांत ठरलेली युद्धबंदी …

Read More »

“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र!

संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे” रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र, त्याआधीपासूनच तिथल्या भारतीयांचं काय होणार? ते सुरक्षित मायदेशी पोहोचणार का? अशी चर्चा आणि संबंधित भारतीयांच्या कुटुंबियांना चिंता लागलेली होती. यासंदर्भात अनेक प्रयत्नांनंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय, विशेषत: तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात …

Read More »

तालिबानच्या ‘दहशतवादी’ मंत्र्याचे छायाचित्र प्रथमच प्रसिद्ध

हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या वेगाने प्रसार होत असलेल्या इस्लामी दहशतवादी माफिया गटाचाही प्रमुख आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचा प्रभारी अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी याचे छायाचित्र तालिबानने प्रथमच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. हक्कानी याला संयुक्त राष्ट्रांनी २००७ मध्येच जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले असून अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी एक कोटी डॉलरचे इनामही जाहीर केलेले आहे. हक्कानी हा हक्कानी नेटवर्क या वेगाने प्रसार …

Read More »

युद्धबंदी कालावधीतही युक्रेनमधील नागरिकांची कोंडी

रशिया व युक्रेन यांनी त्यांच्या शब्दांत ‘शांततेचा कालावधी’ म्हणून युद्धबंदी जाहीर केली असली, आणि मारिउपोल आणि वोल्नोवखा या शहरांतून बाहेर पडण्याकरता नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्याचे जाहीर केले असले, तरी पूर्व युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना हे मार्ग वापरता आलेले नाहीत. त्याऐवजी, काही जण युक्रेनच्या पश्चिम सीमेच्या दिशेने जाऊ शकले असून, रशियासोबतच्या पूर्व सीमेकडे जाऊ शकलेले नाहीत.  सुमी व पिसोचिन वगळता युक्रेनमध्ये …

Read More »

Russia-Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय परतले ; २४ तासांत १५ विमानं दाखल

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती ; पुढील २४ तासांसाठी १३ विमानं नियोजित असल्याचंही सांगितलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली …

Read More »

Russia Ukraine War: रशियाकडून युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा!

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी युद्धविराम जाहीर केला आहे. गेल्या १० दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. (युक्रेन आणि रशिया युद्धाच्या लाईव्ह अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ) युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही संयुक्त …

Read More »

रशियामध्ये Facebook वर पूर्णतः बंदी; खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी ट्विटरवरही लागू केले निर्बंध

तज्ञांचे असे मानणे आहे की युक्रेनमध्ये लढाई वाढत असताना, अधिकाऱ्यांनी टीका करणाऱ्या आवाजांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून फेसबुकची पोहोच कमी करून, त्यांना इशारा दिल्यानंतर आता रशियाने देशात फेसबुकवर पूर्णतः बंदी लादली आहे. रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सी रॉस्कोमन्डझोरने फेसबुक रशियन मीडियासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या अहवालानुसार रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी घालत …

Read More »

Ukraine War: “आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी

युक्रेनने आपल्या मागण्या मान्य केल्यास आपण चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाने म्हटलंय. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तसेच युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. …

Read More »

Russia Ukraine War Live: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटर्सशी बोलणार

Ukraine Russia Crisis Live: रशिया-युक्रेन युद्धातील ताज्या घडामोडी.. Russia Ukraine Crisis Live: रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र …

Read More »

रेल्वे अपघात रोखण्यासाठी विशेष ‘कवच’; खुद्द रेल्वेमंत्र्यांनी घेतली चाचणी, पाहा Video

आज शुक्रवारी कवच या ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणालीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी एका ट्रेनमध्ये खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री होते. एकाच ट्रॅकवर दोन गाड्या भरधाव वेगात समोरासमोर आल्या. त्यापैकी एका ट्रेनमध्ये केंद्रीय मंत्री होते. पण ‘कवच’ मुळे दोन्ही गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली नाही. कवच ही भारतीय रेल्वेने विकसित केलेली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली असून ही चाचणी यशस्वी ठरली आहे. अपघात रोखण्याच्या …

Read More »

“एका मृतदेहाऐवजी…”; युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आणण्यासंदर्भात BJP नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

युक्रेनमध्ये रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्याबाबत भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे भाजपा आमदार अरविंद बेलाड यांनी युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नवीन या वैद्यकीय विद्यार्थ्याचा मृतदेह परत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, एका मृतदेहाऐवजी विमानात दहा जण बसू शकतात. “विमानात मृतदेह आणण्यासाठी जास्त जागा लागते. मृतदेहासाठी लागणाऱ्या जागेत दहा लोक बसू शकतात आणि ते परत …

Read More »

Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थी भयग्रस्त ; मायभूमीत येण्यासाठी व्याकूळ

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावसाशी संपर्क होऊ शकत नाही. येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थानी द इंडियन एक्सप्रेसह्णशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली. मूळ थ्रिसूरचा (केरळ) येथील विद्यार्थिनी निरंजना संतोषने सांगितले, की कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यानी तिला …

Read More »

Russia Ukraine War : एकही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये ओलीस नाही ; रशियाच्या दाव्याचे भारताकडून खंडन

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये कोणताही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवला नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे. रशियाने याबाबत केलेल्या दाव्यानुसार खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवण्यात असून, त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांना रशियन भूमीत जाऊ देण्यास मज्जाव करण्या येत असल्याचा दावा रशियातर्फे करण्यात आला. त्याचे स्पष्ट शब्दांत भारताने खंडन केले आहे. येथे …

Read More »

युक्रेनमधील युद्धात २२७ नागरिक ठार, ५२५ जखमी

जीनिव्हा : एका आठवडय़ापूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत २२७ नागरिक ठार, तर ५२५ नागरिक जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे. यापूर्वी २०१४ साली रशिया समर्थक फुटीरतावादी आणि युक्रेनी फौजा यांच्यात पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या लढाईत १३६ जण ठार, तर ५७७ जखमी झाले होते. त्यापेक्षा ताज्या युद्धातील नागरिकांची जीवहानी जास्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने …

Read More »

भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवले?; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले सत्य

युक्रेन आणि रशिया यांच्यात आठव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे. अनेक भारतीय अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बुधवारी, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दोन सूचना जारी केल्या होत्या, ज्यात भारतीयांना खार्किव सोडण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्ताचे खंडन केले. खार्किवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने सहा …

Read More »

आधीपासून शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर..; युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे युक्रेनचे अनुभव सांगितले. पंतप्रधानांना भेटलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या संसदीय मतदारसंघातील वाराणसीचे लोकही होते. याशिवाय उत्तर प्रदेशातील इतर भागातील विद्यार्थ्यांशीही पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी अगदी …

Read More »

Hijab Ban: कोर्टात हिजाब घालण्यास वकिलांना बंदी; फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मागील अनेक दिवसांपासून देशात हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजतोय. कर्नाटक सरकारने शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींना हिजाब परिधान करण्यास बंदी घातल्यानंतर हा वाद निर्माण झाला. कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर वेगवेगळ्या स्तरावरुन विविध प्रतिक्रिया उमटल्या. तर दुसरीकडे आता फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील हिजाब परिधान करण्यावबाबत मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी घालण्याचा निर्णय फ्रान्समधील सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. फ्रान्समध्ये एप्रिल …

Read More »

युक्रेनियन्ससाठी पायघड्या, नी आम्ही दहा वर्षांनीही तंबूतच; युरोपच्या वागण्यावर सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर लाखो लोक सुरक्षित स्थळांच्या शोधात शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. यामध्ये पोलंड, हंगेरी, बल्गेरिया, मोल्दोव्हा आणि रोमानियासारख्या देशांच्या नेत्यांनी युक्रेनियन नागरिकांचे स्वागत केले आहे. पण दुसरीकडे २०१५ मध्ये अशीच परिस्थिती उद्धभवलेली असताना पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतून, विशेषत: सीरियामधून स्थलांतरितांना अशी वागणूक दिली गेली नव्हती. युरोपीय नेत्यांनी या स्थलांतरितांना विरोध दर्शवला होता. युरोपियन देशांनी एका आठवड्यापेक्षा कमी …

Read More »