Tag Archives: Chandrayaan-3

चंद्रावर लँड होण्याआधी ‘येथे’ फिरवले होते भारताचे दोन्ही चांद्रयान

Chandrayaan : 23 ऑगस्ट 2023… तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. याच दिवशी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि भारताने नवा इतिहास रचला. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान-3 या मोहिमेकडे होते. भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आणि ISRO ने अंतराळ क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता Chandrayaan-3 आणि Chandrayaan-2 मोहिमेच्या …

Read More »

5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात

Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे.   भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते.  7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी …

Read More »

आग ओकणाऱ्या सूर्यासमोर कसा टिकला इस्रोच्या Aditya-L1 चा कॅमेरा? पाहा तो काम तरी कसा करतो

ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता …

Read More »

इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले ‘निलावु कुडिचा सिम्हल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला …

Read More »

चांद्रयान-2 मिशन फेल होण्याचं कारण काय? के. सिवन यांनी प्रमोशन का रोखलं? ISRO चीफ सोमनाथ यांच्या पुस्तकावरून वाद

S Somnath vs K Sivan : भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी संस्थेचे माजी प्रमुख के. सिवन (K Sivan) यांच्यावर एक आरोप केला. दक्षिण भारतातील माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिल्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा धक्कादायक दावा …

Read More »

चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा

Chandrayaan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. साधारण 45 दिवसांचा प्रवास केल्यानंतर हे यान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. त्यानंतर चांद्रयानाच्या विक्रम लँडर आणि त्यातून चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या प्रज्ञान रोव्हरनं तेथील भूमीची झलक पृथ्वीवासियांना दाखवली.  कौतुकाची बाब म्हणजे चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हरमुळं चंद्रावर जाणवलेल्या भूकंपाचीही माहिती मिळाली. ज्यानंतर चंद्रावरील …

Read More »

Interesting Fact : सूर्यप्रकाशामुळं पृथ्वीवर उजेड, मग अवकाशात अंधार का?

Interesting Fact : अवकाशासंबंधीच्या अनेक व्याख्या आपण अभ्यासात पाहिल्या, वाचल्या, पाठ केल्या. परीक्षेत त्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. याच अवकाशाशी संबंधित अनेक रहस्य आपल्याला कायमच अवाक् करून गेली. खुद्द संशोधकांनाही बुचकळ्यात पाडणाऱ्या या अवकाशामध्ये कैक आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आणि लघुग्रह आहेत. धुळीचे, दगडांचे, प्रचंड उष्णता असणारे ग्रहसुद्धा आहेत. याच अंतराळात धगधगता आणि पृथ्वीवर होणाऱ्या दिवस- रात्रीच्या चक्रासाठी कारणीभूत …

Read More »

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत Chandrayaan 3…; ISRO ची मोठी घोषणा

भारताची चांद्रयान 3 मोहीम पूर्ण झाली असून, यशस्वी ठरली आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. सध्या दोघेही डिअॅक्टिव्ह म्हणजेच झोपेत आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे. जर दोघांना जाग आली तर उत्तम, अन्यथा कोणतंही नुकसान होणार नाही आहे. आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही असं इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस …

Read More »

अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच

Japan Moon Mission : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 चा विक्रम लँंडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर असून त्यांना पुन्हा Active करण्यासाठी इस्रोच्या टीमकडून अथक प्रयत्न सुरु आहेत. तर, दुसरीकडे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जपान स्मार्ट लँडर अर्थात मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे.  पृथ्वीवरील सूर्योदय अंतराळातून कसा दिसतो याचा फोटो जपानच्या मून स्नायपरने टिपला …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला …

Read More »

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा, म्हणाले ‘आता फक्त 13 दिवसात…’

चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरला जेव्हा डिअॅक्टिव्ह करण्यात आलं होतं, तेव्हा त्यातील काही सर्किट हे जागे म्हणजेच अॅक्टिव्ह ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जेणेकरुन इस्रो 22 सप्टेंबरला जो संदेश पाठवणार आहे, तो रिसीव्ह केला जाईल. दरम्यान, इस्रो सतत चांद्रयान 3 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रज्ञानकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे.  इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस …

Read More »

Sleep Mode वर गेलेल्या चांद्रयान 3 ला पुन्हा जाग येणार की नाही? ISRO चा मोठा खुलासा

चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सध्या विश्रांती घेत असून, त्यांना पुन्हा रिलाँच म्हणजेच जागं कधी केलं जाणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज म्हणजेच 22 सप्टेंबरला जागे होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रया3 म्हणजेच  लँडर आणि रोव्हरला उद्या 23 सप्टेंबरला …

Read More »

ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जुलै महिन्याच्या 14 तारखेला चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं या चांद्रयानाचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता 45 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि जागतिक स्तरावर या यशाची नोंद झाली. पुढं लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला आणि त्यानंही …

Read More »

चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही

Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चांद्रयान-3ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. इस्रोची चांद्रयान-3 मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देशासह संपूर्ण जगभरातून अभिनंदन करण्यात आले. चांद्रयान-3च्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या एका कर्मचाऱ्यावर मात्र रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे. झारखंडची राजधानी रांची येथील जुन्या विधानसभा भवनासमोर …

Read More »

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू’

Chandrayaan 3 : चांद्रयान – 3 मोहिमुळे जगभरात भारताचा कौतुक होत आहे. त्यानंतर आता देशाने सूर्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र दुसरीकडे बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत. विरोधकांप्रमाणे आता सामान्य जनताही बेरोजगारीच्या मुद्दयावरुन सरकारला जाब विचारत आहे. अशातच लोकांनी काम मागितल्या नंतर हरियाणाच्या (Haryana) मुख्यमंत्र्यांनी (Manohar Lal Khattar) दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हरियानाचे मुख्यमंत्री …

Read More »

40 दिवसांत भारताचे चांद्रयान 3 पोहचले; जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर का पोहचणार?

Japan Moon Mission : भारता पाठोपाठ आता जपानचे यान देखील चंद्रावर पोहचणार आहे. भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. आता जपानच्या मून मिशनने भरारी घेतली आहे. जपान आपले स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर पाठवले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे 40 दिवसांत चंद्रावर पोहचले. जपानचे यान 6 महिन्यांनी चंद्रावर लँंडिग करणार आहे.  …

Read More »

चंद्रावर सध्या विश्रांती करणारं चांद्रयान 3 कसं दिसतंय? पाहा NASA ने काढलेला PHOTO

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने (NASA) चांद्रयान 3 चा फोटो काढला आहे. हा फोटो त्या ठिकाणचा आहे, जिथे चांद्रयान 3 चं विक्रम लँडर उतरलं होतं. नासाने फोटोत चौकोन करत ही लँडिग साईट दाखवली आहे. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश असून, 23 ऑगस्टला चांद्रयान 3 ने …

Read More »

Video: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप…, चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल

Chandryan-3: 23 ऑगस्ट रोडी चांद्रयान-३ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिग केल्यापासून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत मोहिमेची माहिती देत आहे. आताही इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटलं आहे की विक्रम लँडरने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग केले आहे.  इस्रोचा Hop Experiment …

Read More »

सूर्यमोहिमेबद्दल ISRO कडून मोठी अपडेट, Aditya L1 ची लाँच रिहर्सल पूर्ण, काऊंटडाऊन सुरु

चंद्रमोहीम यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोला सूर्यमोहिमेचे वेध लागले आहेत. ही भारताची पहिलीच सूर्यमोहिम असणार आहे. 2 सप्टेंबरला इस्रो ‘आदित्य एल1’ चं प्रक्षेपण करणार असून, यान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण होणार असून, मोहीम अंतिम टप्प्यात असल्याने इस्रोचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, इस्रोने या मोहिमेसंबंधी नवी माहिती दिली असून, लॉचिंग रिहर्सल …

Read More »

Smile Please! प्रज्ञान रोव्हरने पाठवला नवा फोटो, पाहा कसं दिसतंय विक्रम लँडर, अभिमानाने फुगेल छाती

चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करुन आठवडा झाला आहे. भारताच्या या मोहिमेमुळे जगाला अनेक नव्या गोष्टींची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून भारतीय संशोधक चंद्राच्या पृष्ठभागावर आढळलेल्या गोष्टींचा अभ्यास करत आहेत. यादरम्यान, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवेकडील पृष्ठभागावर उतरलेल्या विक्रम लँडरचा पहिला फोटो शेअर केला आहे. इस्रोने हा फोटो शेअर केला आहे.  इस्रोने ट्वीट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की “चांद्रयान …

Read More »