Tag Archives:  

आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून (Playing 11) डीआरएसपर्यंत (DRS) काही बदल करण्यात आलेत. दरम्यान, कोरोना महामारीचा (COVID-19) क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. आयपीएलच्या संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास …

Read More »

भरमैदानात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या, कोण होते संदीप नांगल अंबिया?

Who Is Sandeep Nangal Ambian: पंजाबमधील (Panjab) जालंधरमध्ये (Jalandhar) सोमवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल अंबिया  (Sandeep Singh Ambiya) यांची हत्या करण्यात आली. एका कबड्डी सामन्यादरम्यान अज्ञातांनी संदीप नांगल अंबिया याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. संदीप नांगल अंबियाच्या हत्येनं कबड्डी विश्वात एकच खळबळ …

Read More »

ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला

Cristiano Ronaldo: मँचेस्टर युनायटेडनं (Manchester United) प्रीमियर लीगमध्ये (Premier League)टॉटनहॅमविरुद्ध (Tottenham) सामन्यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) इतिहास रचलाय. या सामन्यात हॅट्रिक गोल करून ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनलाय. रोनाल्डोच्या खात्यावर तब्बल 807 गोल जमा आहेत. या कामगिरीसह त्यानं महान फुटबॉलपटू जोसेफ बिकान (Josef Bican) यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडीत काढलाय. जोसेफ बिकान यांच्या नावावर …

Read More »

IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर

IND vs SL Test : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या  डे-नाइट टेस्ट सामन्यात भारताने आघाडी घेतली आहे. सध्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 419 धावा तर भारताला विजयासाठी नऊ विकेट्सची गरज आहे. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात युवा खेळाडू श्रेयस अय्यरने 67 धावा करत अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्यामुळे अय्यर डे-नाइट टेस्ट …

Read More »

भारताची सामन्यावर मजबूत पकड, श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज,तर भारताला 9 विकेट्स अनिवार्य

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. भारतानं दुसरा डाव 9 विकेट गमावत 303 धावांवर घोषित केला ज्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 446 धावांची गरज होती. पण दिवसाचा खेळ संपण्याआधी जसप्रीतनं एक विकेट घेतल्याने आता श्रीलंकेची अवस्था 28 वर एक बाद असून विजयासाठी 419 धावांची गरज त्यांना आहे. …

Read More »

Rishabh Pant Record : कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, पंतनं रचला इतिहास

Rishabh Pant Test Record: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावत नवा विक्रम केला आहे. पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावत महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आज अगदी टी20 क्रिकेटप्रमाणे …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचं सामन्यावर वर्चस्व, दुसरा डाव खेळण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात सध्यातरी भारताने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 252 धावा करुवन श्रीलंकेला 109 धावांत भारताने सर्वबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या भारताच्या डावात भारतीय फलंदाज मैदानावर आहेत. या सामन्यात विजय मिळवून भारतीय …

Read More »

भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?

IND Vs SL:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर खेळला जात आहे. हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास आहे. श्रीलंकाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कारकिर्दीतील 400 सामना आहे. भारताकडून 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार रोहित 9वा खेळाडू ठरलाय. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अव्वल स्थानी आहेत. …

Read More »

IND vs SL 2nd Test Live: भारताचा दुसरा डाव सुरु, सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला …

Read More »

भारत- श्रीलंका यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) दोन सामन्यांच्या मालिकेतील अखरेचा सामना खेळला जात आहे. आजचा सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला …

Read More »

पिंक बॉल कसोटीत आतापर्यंत किती शतकं झळकली? यादीत एकमेव भारतीय खेळाडू

Pink Ball Test: भारत आणि श्रीलंका (Ind Vs SL) यांच्यात आज बेंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी दोन वाजता सुरुवात होईल. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताचा श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न असेल. गेल्या पाच वर्षांत एकूण 18 डे-नाईट कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी दोन तृतीयांश सामने चार किंवा …

Read More »

भारत- श्रीलंका दुसरा कसोटी सामना, कधी, कुठे पाहाल दुसरा कसोटी सामना?

IND vs SL 2nd Test: भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामने पार पडत असून टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने क्लीन स्वीप दिला. ज्यानंतर आता कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना जिंकून भारत व्हाईट वॉश देऊ शकतो. तर या सामन्याला आता …

Read More »

डे-नाईट कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाकडं दोन विक्रम मोडण्याची संधी

IND vs SL: बंगळुरूच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्डेडिअममध्ये (M Chinnaswamy Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडं (Ravindra Jadeja) दोन विक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. दुसऱ्या कसोटी सामन्यात जडेजाला दोन विकेट्स घेऊन बीएस चंद्रशेखर यांचा विक्रम मोडीत काढू शकतो.  याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये तो 2500 धावांचाही टप्पा गाठू शकतो. जाडेजा …

Read More »

टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं उचललं मोठं पाऊल

Cheteshwar Pujara: टीम इंडियात स्थान न मिळाल्यानं चेतेश्वर पुजारानं काउंटी चॅम्पियनशिप आणि रॉयल लंडन वन-डे स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतलाय. पुजारा आता ससेक्स संघाकडून खेळणार आहे. ट्रॅव्हिड हेडच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंटमुळं त्यानं संघ सोडल्याची माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पुजारानं खराब कामगिरी केली होती. ज्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.  लवकरच …

Read More »

विराट कोहली, रोहित शर्मा नव्हंतर ‘या’ भारतीय खेळाडूंना मिळालं आयसीसीच्या पुरस्कारांसाठी नामांकन

ICC Player of the Month: आयसीसीनं ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केलीय. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. दरम्यान, महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंसाठी सहा खेळाडूंना नामांकन मिळालं आहे. ज्यात श्रेयस अय्यर, मिताली राज आणि दिप्ती शर्मा या तीन भारतीयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आयसीसीनं पुरुष आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी यूएईच्या वृत्या अरविंद आणि …

Read More »

झुलन गोस्वामीची ऐतिहासिक कामगिरी; विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी केली बरोबरी

Jhulan Goswami: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. झुलननं आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज लिन फुलस्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. लिन फुलस्टनच्या नावावर 39 विकेट्सची नोंद आहे. महिला विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची …

Read More »

क्रिकेटमधील सर्वात मोठा थरार! भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार तिरंगी मालिका?

<p><strong>Nick Hockley:</strong> भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कदाचित लवकरच भारत आणि पाकिस्तान तिरंगी मालिकेत एकत्र खेळताना दिसतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलिया भारत आणि पाकिस्तानसोबत तिरंगी मालिका खेळण्यास इच्छुक आहे. ही मालिका होस्ट करायला आवडेल, असंही त्यांनी म्हटलंय.&nbsp;</p> <p>भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 मध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. ही …

Read More »

आरसीबीला मिळाला नवा कर्णधार? विराटनंतर ‘हा’ खेळाडू संघाची कमान संभाळण्याची शक्यता

IPL 2022:  भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 15) पंधराव्या हंगामाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अद्यापही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं (RCB) त्याच्या कर्णधाराची घोषणा केली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज फॉफ डू प्लेसिसचं (Faf du Plessis) नाव आरसीबीच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यालाही कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार …

Read More »

सचिन माझ्या स्वप्नात यायचा आणि गोलंदाजीवर धुलाई करायचा; शेन वॉर्नने दिली होती कबुली

Shane Warne: महान फलंदाज शेन वॉर्नच्या आकस्मित मृत्यूने अवघ्या जगाला धक्का बसला आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे. शेन वॉर्नची 15 वर्षाची क्रिकेट कारकीर्द वादळी ठरली. फलंदाजांचा कर्दनकाळ असलेल्या शेन वॉर्नला मात्र भारताचा सचिन तेंडुलकर भारी पडला होता. तो इतका भारी होता की शेन वॉर्नच्या स्वप्नातही सचिन यायचा आणि त्याच्या गोलंदाजीवर धुलाई …

Read More »

भारताचा माजी क्रिकेटर नोएल डेव्हिड किडनीच्या आजारानं त्रस्त

Noel David Health Updated: हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांनी सोमवारी भारताचा माजी क्रिकेट नोएल डेव्हिड यांची (Noel David) भेट घेतली. नोएल डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त आहेत.  त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे मोहम्मद अजहरुद्दीन यांनी आश्वासन दिलं. “एचसीए केवळ नोएल डेव्हिडच्या आरोग्याची काळजी घेणार नाहीतर, त्यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण …

Read More »