Tag Archives: क्राइम न्युज

पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला अटक

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना लाखों रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लुल्लानगर येथे कारवाई करीत त्याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी माजी लष्करी कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर …

Read More »

पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने…

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या कृत्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पतीनं असं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन सखोल तपास सुरु केला आहे. …

Read More »

नागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपुरात हत्यांची मालिका सुरूच आहे. नागपुरात गेल्या 48 तासात तीन तर फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सात जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का असे प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. गेल्या 48 तासात नागपुरातील नंदनवन आणि कळमना पोलीस स्टेशनच्या …

Read More »

परेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांना दोन दिवसांपूर्वी चांगलाच दणका दिला होता. आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात गुंड गजानन मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, सचिन पोटे यांच्यासह 300 गुंडांची चौकशी करून त्यांना समज देण्यात आली. अमितेश कुमार यांच्या या कारवाईची राज्यभरात चर्चा सुरु झाली …

Read More »

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप

Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला तरुण माजी आमदाराचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास …

Read More »

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : प्रेमप्रकरणातून एका मुलाच्या बापाला आणि आईला विद्युत खांबाला बांधून करण्यात आल्याचा खळबळजन प्रकार सांगली जिल्ह्यात समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. सांगली पोलिसांनी याप्रकरणी 12 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात आरोपींना अटक …

Read More »

पुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला अटक केली आहे. पुण्यातील …

Read More »

नाश्ता मिळाला नाही म्हणून मुलाने सोडलं घर; रेल्वेरुळाशेजारी सापडला मृतदेह

Nagpur Crime : नागपुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे.  शुल्लक कारणावरुन एका अल्पवयीन मुलाने रागावून रेल्वे रुळांशेजारी जाऊन आत्महत्या केली आहे. मुलाच्या या टोकाच्या निर्णयानंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. आईसोबत झालेल्या वादातून मुलाने हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रागातून मुलगा घरातून निघून गेला होता. आई वडीलांनी पोलिसांत धाव घेऊन त्याचा शोध सुरु केला. मात्र शेवटी त्याचा मृतदेह …

Read More »

स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

Pune Crime : पुण्यात (Pune News) स्कूटर आणि कॅबच्या धडकेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) स्कूटरचालकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी बाणेर रोडवरील पेट्रोल पंपावर दुपारी  4.20 च्या सुमारास झालेल्या किरकोळ अपघातानंतर 22 वर्षीय स्कूटर चालकाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या मित्रावर चतुश्रुंगी पोलिसांनी कॅब चालकाला मारहाण करून त्याची भाड्याची गाडी पळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा’; कोर्टाने दिले आदेश

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एका तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचा आदेश कोर्टाने दिले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Pune Police) दाखल गुन्ह्यात साक्ष नोंदवण्यासाठी वारंवार बोलावूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या माजी पोलीस कर्मचाऱ्याल अटक करून कोर्टात आणण्याचा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. एस. डी. कांबळे असे निरीक्षकाचे नाव असून ते …

Read More »

‘माझा मुलगा गेलाय, डीजे लावू नका!’ म्हणणाऱ्या बापाला 21 जणांकडून बेदम मारहाण

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : गुरुवारी राज्यभरात लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला आहे. काही ठिकाणी गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2023) गालबोट लागलं आहे. मात्र पुण्यात (Pune Crime) चार दिवसांपूर्वी डीजे लावू नका असा सांगणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल 21 जणांनी मारहाण केल्याचा प्रकार मावळमध्ये समोर आला आहे. मुलाचे निधन झालं आहे त्यामुळे घरासमोर डीजे (DJ) लावू नका अशी विनंती मारहाण झालेल्या …

Read More »

‘तुम सेक्स करोगी?’ घरात घुसून स्विगी डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) स्विगीच्या (Swiggy) डिलिव्हरी बॉयने एका तरुणीसोबत अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने घरात घुसून 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या नावाखाली डिलिव्हरी बॉय घरात घुसला होता. त्यानंतर त्याने तरुणीकडे  थेट शरीर सुखाची …

Read More »

ढोल ताशा पथकात जातो म्हणून पुणेकर आजीची नातवाला पाईपने मारहाण; पुण्यातील अजब प्रकार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मंडळांपासून ढोल ताशा पथकापर्यंत (Dhol Tasha Pathak) सर्वांचीच जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील (Pune News) ढोलताशा पथके ही गणेशोत्सवात खास आकर्षण असतात. मात्र या ढोलताशा पथकामुळे एका आजीने तिच्या नातवाला बेदम मारहाण केली आहे. ढोल ताशा पथकात जातो म्हणून मुलाच्या आजीने आणि आत्याने …

Read More »

पुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) पशुवैद्यकीय डॉक्टरच्या किचकट अपरहण प्रकरणातील सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांकडून (Pune Police) अखेर अटक करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या अपहरण (Abduction) प्रकरणात त्याची विभक्त पत्नी, पहिल्या पत्नीची धाकटी भावजय व भावजयीचा प्रियकर यांनी मिळून अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले आहे. पतीच्या अपहरणानंतर त्याची हत्या करण्याचा कट पत्नीने आखला होता. …

Read More »

स्टेडिअमचं बांधकाम लवकर व्हावं म्हणून दिला बोकडा बळी; नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा प्रताप

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. राजकीय नेत्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. नाशिक शहरातील सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमचे (Raje Sambhaji Stadium) काम विना विघ्न पार वावे म्हणून माजी नगरसेविकेने (ex corporator) स्टेडियममध्ये चक्क बोकड बळी दिल्याची घटना घडली आहे. हा …

Read More »

भांडण दोघांचे राग तिसऱ्याला आला अन्… नाशिकमध्ये तरुणांची निर्घृण हत्या

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) शहरात सशस्त्र तरुणांनी भररस्त्यात दोन जणांना भोसकून त्यांचा दिवसाढवळ्या खून केला आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने दोन युवकांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. टोळक्याच्या हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्लेखोर सीसीटीव्ही …

Read More »

‘पती लक्ष देत नाही म्हणून….’; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पती आपल्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून लग्नापूर्वीच्या मित्राच्या मदतीने पत्नीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये (Nagpur Crime) समोर आला आहे. आरोपी महिलेने मित्राच्या मदतीने घरातून तब्बल 13 लाख रुपयांची चोरी केली आहे. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होती. तपासामध्ये पोलिसांनी महिलेवर संशय आल्याने तिची चौकशी करण्यात …

Read More »

द्राक्षाच्या शेतात आधी वार केले, नंतर 100 फूट लांब ओढत नेलं; 17 वर्षाच्या मुलाकडून 32 वर्षीय महिलेची हत्या

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashi Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस (Nashik Police) प्रशासनाकडून गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गंभीर घडताना दिसत आहे. अशातच एका अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या चांदवडमध्ये (chandwad) घडला आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक गुन्ह्याची …

Read More »

नागपूर हादरलं! खेळता खेळता बेपत्ता झालेल्या 3 मुलांचा करुण अंत

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : बंद पडलेल्या कारमध्ये गुदमरुन झालेल्या तीन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने नागपुरातील (Nagpur Crime) फारुक नगर परिसर हादरून गेला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. मात्र या तिन्ही बेपत्ता मुलांचे मृतदेह एका बंद पडलेल्या कारमध्ये सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यूने झाल्याने …

Read More »

Nashik Crime : सख्ख्या भावानेच केली मोठ्या भावाची हत्या

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारीच्या (Nashik Crime) घटनांमुळे स्थानिकांकमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय. या हत्येनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) या प्रकरणी संशयित आरोपी भावाला ताब्यात घेतले असून …

Read More »