श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

Swara Bhasker: श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं, हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे.’ असं लिहिलं आहे. 

स्वराचं ट्वीट

स्वरानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे. यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्या मुलीबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. त्या मुलीच्या प्रिय आणि विश्वासू व्यक्तीने तिचा विश्वासघात केला. आशा आहे की, पोलीस त्यांचा तपास त्वरीत पूर्ण करतील. त्या राक्षसाला योग्य ती कठोर शिक्षा मिळेल, अशी आशा व्यक्त करते.’ या ट्वीटमध्ये स्वरानं श्रद्धा नावाचा हॅशटॅग आणि तुटलेल्या हार्ट ब्रेक इमोजीचा  वापर केला आहे. श्रद्धाच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

नेमकं प्रकरण काय? 

हेही वाचा :  मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला अटक केल्यानंतर सहा महिन्यांनी ही अत्याचारी घटना उघडकीस आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे काही अवशेष सापडले आहेत. सध्या पोलीस हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत. आफताब पूनावालानं पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं की, “हत्येपूर्वी काही दिवस श्रद्धानं आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. वैतागल्यामुळे रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली.’

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shraddha Murder Case : श्रद्धाचं डोकं अद्यापही सापडलं नाही, आफताबच्या मित्रांचा शोध सुरु; पोलिसांच्या तपासाला वेगSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …