Suryakumar Yadav Namaste Celebration: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला क्लीन स्वीप दिलंय. दरम्यान, युवा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या 4 षटकात 86 धावा केल्या. सुर्यकुमार यादवनं 28 चेंडूत त्याचं अर्धशतकीय खेळी केली. सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकीय खेळीनंतर केलेल्या सिलेब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 आणि एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवनं शानदार कामगिरी केली. सुर्यकुमार यादव भारताकडून एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ठरला होता. तर, टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत दुसरा क्रमांकावर आहे. सूर्यकुमारनं कोलकातामध्ये टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात झंझावाती अर्धशतक ठोकलं. या अर्धशतकानंतर मैदानातच सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ-
भारतानं 93 धावांवर 4 विकेट्स गमावले. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनं तुफान फटकेबाजी करीत भारताचा स्कोर 184 वर पोहचवला. सुर्यकुमार यादवनं 31 चेंडूत 65 (1 चौकार, 7 षटकार) आणि व्यंकटेश अय्यरनं 19 चेंडूत नाबाद 35 (4 चौकार, 2 षटकार) धावांची खेळी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर सूर्यकुमारनं चाहत्यांना आणि सर्वांना नमस्कार केला. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha