2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

Year Ender 2022: 2022 हे वर्ष बॉलिवूडबरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीसाठी देखील खास वर्ष होते. या वर्षी अनेक साऊथ चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला. जाणून घेऊयात 2022 मध्ये रिलीज झालेले साऊथचे चित्रपट…

केजीएफ-चॅप्टर-2 (K.G.F: Chapter 2)
केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.  14 एप्रिल 2022 रोजी केजीएफ-चॅप्टर-2 हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात यश, संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत निल यांनी केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. 

आरआरआर (RRR)
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत सामील झाला आहे. 2022 मधील हिट आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत आरआरआर या पॅन इंडिया फिल्मच्या नावाचा समावेश होतो. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली.

हेही वाचा :  कांतारा फेम ऋषभ शेट्टी 'या' चित्रपटात करणार नाही काम?

विक्रम (Vikram)
कमल हसन यांचा विक्रम हा चित्रपट 3 जून 2022 रोजी  हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज झाला. या चित्रपटात कमल हसन यांच्यासोबतच विजय सेतूपतीनं देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कणगराज यांनी केलं.

News Reels

777 चार्ली (777 Charlie)
777 चार्ली  हा चित्रपट 10 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टीनं  प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानक आणि कलाकांच्या अभिनायनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 

सीता रामम (Sita Ramam)
सीता रामम हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 91.4 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली. 2022 मध्ये हिट ठरलेल्या तेलगू चित्रपटांच्या यादीत सीता रामम या चित्रपटाच्या नावाचा समावेश होतो. 

पोन्नियिन सेल्वन: I (Ponniyin Selvan: I)
दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन: I या चित्रपटाचं नाव 2022 या वर्षाच्या सर्वाधिक कमाई  करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झालं.  30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात विक्रम, ऐश्वर्या राय, जयम रवी, कार्थी, तृषा कृष्णन आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा :  'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' गाणं प्रदर्शित

कांतारा (Kantara)
2022 मध्ये ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. माणूस आणि निसर्ग यांच्या नातेसंबंधावर अधारित असणाऱ्या या चित्रपटानं 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवलं.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Youtube Top 10 Music Videos : 2022 मध्ये ‘पुष्पा’ ची हवा; युट्यूबकडून टॉप-10 म्युझिक व्हिडीओची यादी जाहीर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …