स्तनपानादरम्यान स्मार्टफोनचा वापर आईला करतोय बाळापासून दूर, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

बाळ झाल्यानंतर संपूर्ण वेळ हा आई म्हणून त्यांच्या मागेच असतो. मात्र स्तनपान करताना थोडा वेळ मिळतो जेव्हा फोनचा वापर करता येतो असं अनेक नवजात आईंना वाटत असते. त्यामुळे हल्ली स्तनपानादरम्यान आई स्मार्टफोनचा अधिक वापर करताना दिसून येत आहे असे सांगण्यात येतेय.

एकीकडे, स्मार्टफोनसारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सोयीस्कर बनते, परंतु दुसरीकडे, स्तनपान करताना किंवा समोरासमोर संवाद साधताना स्मार्टफोनचा वापर यामुळे आई आणि बाळातील संवाद हरवताना दिसून येत आहे. आई आणि बाळावरही याचा शारीरिक आणि मानसिक परिणाम होतोय. याबाबत डॉ. सुनिता तांदुलवाडकर, मुख्य IVF सल्लागार आणि एन्डोस्कॉपिस्ट, रूबी हॉल क्लिनिक यांनी विशेष माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)

आई-बाळाचा शारीरिक संवाद महत्त्वाचा

आई-बाळाचा शारीरिक संवाद महत्त्वाचा

माता आणि अर्भक यांच्यातील प्राथमिक परस्परसंवाद ही प्रारंभिक परिस्थिती निर्माण करतात जी अर्भकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात. स्तनपान करताना स्मार्टफोनचा वापर केल्याने, आईची स्थिती आणि त्यांच्या बाळाशी संवाद बिघडण्याची शक्यता असते. स्किन टू स्किन केअर ही संकल्पना एका बाजूला सांगताना बाळाकडे स्तनपान करताना मात्र दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही.

हेही वाचा :  हिजाब न घालता केला डान्स , तिला मिठीत घेताच झाली १० वर्षांची शिक्षा 'या' देशात करू नका रोमान्स

काय होतात परिणाम?

काय होतात परिणाम?

त्याचे परिणाम पालक-मुलाचे नाते न घडण्यात होतात. याशिवाय नवजात बाळाच्या आईला पाठदुखीसारखे शारीरिक दुखणे सतावते. तर दुसऱ्या बाजूला स्तनपानाबाबत बाळाचे समाधान होत नाही आणि बाळाची सतत चिडचिड होते.

(वाचा – बाळाला गुटगुटीत बनविण्यासाठी आईने असे बनवावे घरच्या घरी सेरेलॅक, पौष्टिक आहार गरजेचा)

स्मार्टफोनसह आणि शिवाय आईची वागणूक वेगळी

स्मार्टफोनसह आणि शिवाय आईची वागणूक वेगळी

असे आढळून आले की स्तनपानाच्या दरम्यान स्मार्टफोन ऑपरेशनची उपस्थिती किंवा अनुपस्थिती आणि स्तनपान करायच्या काळात जी आई स्मार्टफोन पाहते आणि जी आई स्मार्टफोनपासून दूर असते यातील तफावत दिसून आली आहे. आईची या काळातील स्थिती आणि बाळाशी होणारा संवाद हा भिन्न असतो. . यावरून हे शक्य आहे की, स्तनपानादरम्यान स्मार्टफोनच्या वापरामुळे होणारा बदल आई आणि बाळावर परिणाम करू शकतो.

(वाचा – एडिमामुळे प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे नेमके काय)

मातृसंवेदशीलता राहात नाही

मातृसंवेदशीलता राहात नाही

स्मार्टफोनच्या वापरामुळे मातृसंवेदनशीलता राहात नाही असेही दिसून आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाला याच वेळेपासून सामाजिक परस्परसंवादाचा पाया घडवावा लागतो. मात्र तोच वेळ आई स्मार्टफोन पाहण्यात घालवत असेल तर बाळाकडे लक्ष राहात नाही. याचे वैज्ञानिक निरीक्षण झाले नसल्यामुळे त्याचा शारीरिक नक्की काय परिणाम होतो याची मांडणी करता येत नाही.

हेही वाचा :  7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

(वाचा – एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? लक्षणं, कारणे आणि उपचार घ्या जाणून)

स्तनपान करताना बाळाकडे लक्ष हवे

स्तनपान करताना बाळाकडे लक्ष हवे

स्तनपान करताना बाळाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. बाळ किती दूध पित आहे अथवा दूध पिताना बाळाचा श्वास अडकत तर नाही ना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. भावनिक गोष्टींसह या महत्त्वाच्या गोष्टींकडे स्मार्टफोनच्या वापरात विसर पडून बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो.

रेडिएशनपासून दूर ठेवणे गरजेचे

रेडिएशनपासून दूर ठेवणे गरजेचे

सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे बाळाला स्मार्टफोनच्या रेडिएशनचा त्रास पोहचू शकतो. बाळाच्या आरोग्यासाठी हे रेडिएशन योग्य ठरत नाहीत. त्यामुळे स्तनपान करताना आईने बाळाकडेच व्यवस्थित लक्ष पुरवायला हवे.
स्तनपान देणे ही केवळ प्रक्रिया नाही तर आई आणि मुलामधील तो एक नैसर्गिक बंध आहे आणि तो जपण्याची गरज असून स्मार्टफोनपासून दूर राहण्याची गरज आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …