Shraddha Murder Case: आफताबची तिहार जेलमध्ये पहिली रात्र, ब्लँकेट घेऊन आरामात झोपला

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे. आफताबला तिहार जेलमध्ये बराक नंबर 4 मध्ये ठेवण्यात आलं आहे. आफताबसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून जेलमध्ये आफताबवर 24 तास सीसीटीव्हीची (CCTV) करडी नजर ठेवण्यात येतेय. जेलच्या वॉर्डनं इतर कैद्यांपासून त्याला दूर ठेवलंय. त्याच्या खाण्यापीण्यावरही पोलीस करडी नजर ठेवून आहेत. पोलिसांच्या समोरच त्याला जेवण दिलं जातं.

जेलमध्ये आफताब टेन्शन फ्री
श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तर देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत. उलट रात्री आफताब ब्लँकेट घेऊन आरामात झोपला. 

आफताबवर कडेकोट सुरक्षी
आफताबची पॉलिग्राफ टेस्ट (Poligraphy Test) करण्यात आली. आता सोमवारी त्याची नार्को टेस्ट (Narco Test) होण्याची शक्यता आहे. तिहार जेलमध्ये त्याच्या सुरक्षेवरुन जेल प्रशासन अलर्ट झालं असून कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. ज्या बराकमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे, त्याबाहेर एक पोलीस 24 तास तैनात करण्यात आला आहे.  

हेही वाचा :  उल्हासनगर: रस्त्याने जाताना धक्का लागला अन् तरुणाने जीव गमावला, थरार सीसीटीव्हीत कैद, Video

हे ही वाचा : पालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका

आफताबची सोमवारी नार्को टेस्ट
आफताबला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधीच त्याच्या नार्को टेस्टची तयारी करण्यात आली आहे. शनिवारी दिल्लीतल्या रोहिणीमधल्या आंबेडकर रुग्णालयात आफताबची मेडिकल चाचणी (Medical Checkup) करण्यात आली, नार्को टेस्टसाठी ही चाचणी महत्त्वाची असते. सोमवारी आफताबाची नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे.

श्रद्धाचे 35 तुकडे करुन जंगलात फेकले
आरोपी आफताब(Accused Aaftab) हा श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर (live in relationship) होता. आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे  35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात (Mehrauli Forest) फेकत होता. पोलिस त्याची कसून चौकशी आहेत.  

आफताबवर क्राईम, थ्रिलर मूव्हींचा प्रभाव
श्रद्धाचा मारेकरी आफताबवर क्राईम, थ्रिलर मूव्हींचा प्रभाव होता. अशी कबुली  आफताबने पॉलिग्राफी टेस्टमध्ये दिली आहे. आफताबची सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. काल आफताबला कोर्टात हजर केले असता त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …