धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीचा सांबारच्या पातेल्यात पडून मृत्यू; वाढदिवशीच झाला दुर्दैवी अपघात


आंध्र प्रदेशमध्ये रविवारी घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये एका दोन वर्षांच्या चिमुकलीचा दूर्देवी मृत्यू झालाय. रविवारी १३ फेब्रवारी रोजी गरम सांबाराच्या पातेल्यात पडून या मुलीचा मृत्यू झालाय. कृष्णा जिल्ह्यामधील कलागरा गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या अपघातानंतर मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र फार जास्त भाजल्याने उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या मुलीचं नाव तेजस्वी असं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शिवा आणि भानूमत यांची दोन वर्षांची मुलगी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घरासमोरच्या अंगणामध्ये खेळत होती. मात्र वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्यात आई-वडील व्यस्त असतानाच तेजस्वी खेळता खेळता स्वयंपाक घरात गेली. ती खुर्चीवर चढून खेळत असतानाच तोल जाऊन समोरच्या गरम सांबाराच्या पातेल्यात पडली.

मोठा आवाज झाल्याने सर्वजण स्वयंपाकघरात पळत आले तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. तेजस्वीला तातडीने तिरुवुरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी वियवाडाला हलवण्यात आलं. मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये अपघातील मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

हेही वाचा :  एबीजी शिपयार्डवर सीबीआयकडून गुन्हा; २२,८४२ कोटींची बँक फसवणूक

The post धक्कादायक! दोन वर्षाच्या मुलीचा सांबारच्या पातेल्यात पडून मृत्यू; वाढदिवशीच झाला दुर्दैवी अपघात appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …