Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात ‘सर्वोच्च’ सुनावणी; आत्तापर्यंत काय घडलं? जाणून घ्या

Maharastra Political News: संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharastra Politics) लक्ष सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे लागले आहे. येत्या ४८ तासांत सत्ता संघर्षांची सुनावणी संपणार आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. मंगळवारी 14 मार्चला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाने युक्तीवाद करायला सुरुवात केली. शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला मात्र, या दोनही वकीलांनी त्यांना अधिकचा वेळ हवा आहे. अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार उद्या अँड निरज किशन कौल आणि अँड हरीश साळवे हे दोनही वकील शिंदे गटाच्या वतीने युक्तीवाद करतील. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने अँड मनिंदर सिंह आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, युक्तीवाद करतील. तसंच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.

जनतेच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल केलेल्या ॲड असिम सरोदे यांना देखील न्यायालय बाजू मांडण्याची संधी देऊ शकते. दरम्यान न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी ॲड असिम सरोदे यांना देखील लिखित स्वरूपात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. (Shiv Sena Crisis Supreme hearing in Supreme Court tomorrow on Shiv Sena Crisis What happened so far know here)

हेही वाचा :  मुलांना भीक मागायला लावत महिलेने 45 दिवसांत कमावले 2.5 लाख रुपये; तपासानंतर संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले

आणखी वाचा – Bhushan Subhash Desai : माझ्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला हे माझ्यासाठी… सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

शिंदे गट उद्या 14 मार्च पूर्ण दिवस आणि 15 मार्चला सकाळच्या सत्रात युक्तीवाद करणार आहे. त्यानंतर ठाकरे गट आपला फायनल युक्तीवाद न्यायालयात करणार आहे.

काय घडलं आत्तापर्यंत?

सुनावणी दरम्यान न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे

तुम्हीच शिवसेना हे विधिमंडळ ठरवू शकत नाही.
अपात्रतेच्या नोटिसा बजावलेले आमदार मतदान कसे करतात?
आमदार अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांचेच आहेत.
ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही.
राज्यपालांनी राजकारणात दखल देऊ नये.

ठाकरे गटाचा युक्तिवाद

राज्यपालांचे बहुमताचे आदेशच रद्द करा.
पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींना हरताळ फासून हे सत्तांतर झाले आहे.
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आमदारांचा गट सरकार पाडू शकतो का?
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आमदारांचा गट विधानसभाध्यक्षांच्या निवडणूकीत सहभाग घेऊ शकतो का?
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदेंना शपथ दिलीच कशी?
प्रतोदचे नेमणूक पक्षप्रमुख करतात…
कायदेशीर असलेले ठाकरे सरकार आमदार खरेदी करून पाडण्यात आले.
राज्यपालांची भूमिका घटनात्मक राजकारणाच्या वैधतेबाबत चुकीची आहे.

हेही वाचा :  बिग बॉस मराठी ४ ची वाघीण तेजस्विनी लोणारीची अदा करतेय चाहत्यांना घायाळ!

शिवसेनेतील फुटीला राज्यपालांनी थेट मान्यता दिली. ते तसे करू शकतात का?

शिंदे गटाचा युक्तिवाद..

हा मुद्दा पक्षफुटीचा नसून पक्षांतर्गत वादाचा आहे.
आमदारांनी विधिमंडळात बहुमताने निर्णय घेतले आहेत, यात हस्तक्षेप करू नये.
पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. कोर्टाला नाही.
उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्याने त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नाही.
आमदारांच्या जिवाला धोका असल्यामुळे आमदार गुवाहाटीत होते.
उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत म्हणून सरकार पडले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …