Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अनेक जणांना ही गोष्ट माहीत नाही की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाची जास्त उंची तिच्या कामाच्या आड येत होती. स्वत: शिल्पानेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये याबाबत सांगितले आहे.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये जादुगाराला स्पर्धक म्हणून पाहिले जाते. परंतु, या जादूगारानेच शिल्पावर जादू केली आणि तिची उंची कमी केली. आधी जादूगाराने शिल्पाला मशीनच्या आत उभं केलं आणि मग मशीनचा बॉक्स कमी करत गेला. त्यामुळे शिल्पाची उंची लहान दिसू लागली. यावेळी ती खूपच घाबरलेली दिसत होती. जादू संपल्यानंतर शिल्पा मशीनमधून बाहेर आली आणि म्हणाली की, याआधी तिला तिच्या उंचीमुळे चित्रपटात काम मिळत नव्हते.
शिल्पा विनोदाने म्हणाली की, ” यापूर्वीच मला हे मिळाले असते तर मला आणखी चित्रपटांमध्ये काम मिळाले असते. पूर्वीचे हिरो इतके उंच नव्हते. मला मिळालेल्या सर्व चित्रपटांमध्ये हिरो माझ्यापेक्षा लहान होते. त्यामुळे मला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळू शकले नाही. मला हा जादुगार पूर्वीच भेटला असता तर आज आणखी चित्रपट केले असते, असा विनोद शिल्पाने यावेळी केली. परंतु, तिला जास्त उंचीमुळे अनेक कामे नाकारण्यात आल्याचं ती सांगते.
शिल्पा 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या शिल्पाने अभिनयातून ब्रेक घेतला असून ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. परंतु, ती काही रिअॅलिटी शोजमध्ये जज म्हणून काही वेळा दिसली आहे. 2021 मध्ये शिल्पा ‘हंगामा 2’ द्वारे अनेक वर्षांनी चित्रपटात परतली आहे.
महत्वच्या बातम्या