सतीशनी काल केली होळी साजरी, आज हार्ट अटॅकने मृत्यू, वाढलेलं वजन ठरलं हार्ट अटॅकचं कारण?

9 मार्च 2023 चा दिवस हा बॉलीवूडवर शोककळा आणणारा दिवस ठरला. कारण ‘मिस्टर इंडिया’ मधलं ‘कॅलेंडर’ हे कॅरेक्टर कायमचं हरवलं. ‘स्कॅम 1992’ मधील ‘बियर’ आता पुन्हा दिसणार नव्हता. कारण अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Veteran Actor Satish Kaushik Passed Away) हे कायमचे आपल्याला सोडून गेले होते. ते केवळ एक महान अभिनेतेच नव्हते तर एक प्रतिभावंत दिग्दर्शक आणि लेखक देखील होते. त्यांच्या अकाली निधनाचे कारण ठरला हृदयविकाराचा तीव्र झटका!

अवघ्या 1 दिवस आधी ते गीतकार javed Akhtar यांच्या घरी होळी खेळताना दिसले होते. त्यांचा फोटो सुद्धा सामोर आला होता. पण दुसऱ्याच दिवशी अचानक ते या जगातून कायमचे निघून गेले. हृदयविकारच्या झटक्याने आजवर अनेक चांगली माणसे आपण गमावली आहेत. कोणी काही म्हणो पण सतीश कौशिक यांच्यातला कलाकार अजून जिवंत होता आणि त्यामुळे त्यांचे असे अकाली जाणे दुर्दैवीच आहे! (फोटो सौजन्य : Instagram/satishkaushik2178)

रितेश देशमुखने दिली श्रद्धांजली

हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय होतं कारण?

हृदयविकाराचा झटका येण्यामागे काय होतं कारण?

अभिनेता सतीश कौशिक यांचे वजन गेल्या अनेक वर्षांपासून वाढले होते हे आपल्याला माहीत आहे. ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी वजन कमी करण्याचाही मार्ग अवलंबला होता. पण त्यानंतरही, त्यांना म्हणावे तसे वजन कमी करता आले नाही. इंस्टाग्रामवरील त्यांचे लेटेस्ट फोटो पाहिले तर त्यातही त्यांच्या वजनात काही फरक दिसून येत नाही आहे. त्यांचे हेच वाढलेले वजन हृदयविकाराचे कारण ठरले आहे का हा आता प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :  हार्ट अटॅकला या ५ सवयी ठरतात घातक, आताच बदला नाही हृदय बंद पडण्याची येईल वेळ

(वाचा :- किडनी 90% पेक्षा जास्त सडल्यास दिसतात ही घातक लक्षणं, रक्तातील घाण बाहेर फेकण्यासाठी करावीच लागते ही प्रक्रिया)​

जाणकार काय सांगतात?

जाणकार काय सांगतात?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या डॉक्टरांच्या मते, लठ्ठपणा हा हृदयरोगासाठी (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग) साठी जबाबदार असू शकतो. कारण, जास्त वजनामुळे टाइप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, झोप विकार, डिस्लिपिडेमिया (कोलेस्टेरॉल, एलडीएल, ट्रायग्लिसराइड वाढणे) यांचा धोका वाढतो आणि या समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर यासारख्या जीवघेण्या परिस्थितींचा धोकाही वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा असल्यास त्यावर त्वरित मात करणे गरजेचे होऊन बसते.

(वाचा :- World Kidney Day: किडनी खराब झाल्यास दिसतात ही 8 लक्षणं, लघवीत जळजळ, फेसाळपणा, फिकट रंग दिसल्यास करा हे 4 उपाय)

हृदय विकारांपासून कसा करावा बचाव?

हृदय विकारांपासून कसा करावा बचाव?

अमेरिकन हार्ट असोसिएशनने म्हटले आहे की लठ्ठपणामुळे होणारा हृदयविकाराचा धोका वेट लॉस करून कमी केला जाऊ शकतो. यासोबतच तुमची जीवनशैलीही सुधारली पाहिजे. असे केल्याने केवळ हृदयाचे आरोग्य सुधारते असे नाही तर टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक इत्यादींचा धोका देखील कमी होतो.
(वाचा :- H3N2 Virus Cough Fever Home Remedies : नव्या व्हायरसचं जगावर सावट, ताप व खोकला सुरू होताच करा हे 8 घरगुती उपाय)​

हेही वाचा :  Pune Crime : तू मॉर्डन नाहीस, नोकर बायका पण तुझ्यापेक्षा चांगल्या, असं म्हणणाऱ्या नवऱ्याला पत्नीने शिकवला असा धडा

या टिप्स करा फॉलो

या टिप्स करा फॉलो

तुम्हाला जर हृदय विकारापासून दूर राहायचे असेल आणि स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर काही टिप्स नक्की फॉलो करा.

  1. धूम्रपान करू नका
  2. दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाली करा
  3. ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा
  4. लो फॅट किंवा फॅट फ्री अन्नपदार्थ खा
  5. संपूर्ण धान्याचे सेवन करा
  6. आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश करा
  7. जास्त मीठ-साखर खाऊ नका
  8. प्रक्रिया केलेले अन्न आणि अल्कोहोलपासून यांपासून दूर रहा.

(वाचा :- International Women’s Day वयाच्या 30 आधीच खायला घ्या हे Vitamins व Mineral, नाहीतर येईल अंथरूणात खिळण्याची वेळ)​
डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …