Salman Khan : ‘किसी का भाई किसी की जान’मधील भाईजानचा हटके लूक समोर

Salman Khan On Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमातील भाईजानचा लूक समोर आला आहे. 

सलमानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या सेटवरील स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दबंग खान खूपच हटके दिसत आहे. लांबलचक केस, लेदर जॅकेट आणि काळा चष्मा असा काहीसा भाईजानचा लूक आहे. त्याचा ब्लॅक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 


News Reels

सेटवरील फोटो शेअर करत सलमानने लिहिलं आहे,”किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. 2023 मध्ये ईदला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल”. सलमानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या माध्यमातून अनेक मंडळी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. यात शहनाज गिल (Shehnaaz Gill), पलक तिवारी (Palak Tiwari), मालविका शर्मा, सिद्धार्थ निगम या कलाकारांचा समावेश आहे. ‘बिग बॉस 16’मधील सर्वांचा लाडका स्पर्धक अब्दू रोजिकदेखील (Abdu Rozik) या सिनेमाचा भाग असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा :  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मिळणार का मुदतवाढ? उद्या निर्णय

सलमान खानसह ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात दग्गुबाती वेंकटेश  (Daggubati Venkatesh), पूजा हेगडे (Pooja Hegde), जगपती बाबू (Jagapathi Babu) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. फरहाद सामजी (Farhad Samji) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : टास्कमध्ये प्रियंकाचा अंकितवर राग अनावर; संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर सलमान खानने दिला ‘हा’ सल्लाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …