Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Russia Ukrain Conflict: रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी (Russia’s President) २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई (Ukrainian military action)चे आदेश दिल्यानंतर हल्ला सुरू झाला आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे (Indian Government) प्रयत्न आधीच सुरू आहेत. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या (Nation Security Counsil) बैठकीत याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परतण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तिरुमूर्ती यांनी यूएनएससीमध्ये सांगितले की, ‘युक्रेनमधील २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना परत येण्याची सोय करत आहोत.’

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, जाणून घ्या तपशील

Bank Job 2022: बँक ऑफ बडोदामध्ये भरती, मुंबईत नोकरीची संधी
दुसरीकडे, भारतीय विद्यार्थ्यांसह १८२ प्रवाशांना घेऊन एक फ्लाइट आज २४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली. या प्रवाशांना युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (Ukraine International Airlines, UIA)) ने दिल्लीत आणले होते.

हेही वाचा :  Ukraine War CCTV Video : रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सायकलस्वारावर पडला बॉम्ब

रत्नागिरी जिल्हा परिषदेत भरती, ७० हजार रुपयांपर्यंत मिळेल पगार
MPSC अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांची भरती, जाणून घ्या तपशील
सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी तात्पुरते युक्रेन सोडावे असा सल्ला २० फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने जारी केला होता. त्याचबरोबर दूतावासाने विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइटसाठी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधावा आणि दूतावासाच्या सोशल मीडिया चॅनेल आणि वेबसाइटवर प्रसिद्ध होणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले होते.

संरक्षण मंत्रालयात दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी
RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …