नदीसुधार योजनेवरील स्थगिती कायम | Postponement river improvement scheme maintained Approval survey Prohibition actual work amy 95


मुळा-मुठा नदीकाठ सुधार (सुशोभीकरण) योजनेबाबत बुधवारी तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीत पर्यावरणवादी संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांवर महापालिकेला उत्तर देता आले नाही

सर्वेक्षणाला मान्यता; प्रत्यक्ष कामाला बंदी

पुणे : मुळा-मुठा नदीकाठ सुधार (सुशोभीकरण) योजनेबाबत बुधवारी तब्बल सहा तास चाललेल्या बैठकीत पर्यावरणवादी संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांवर महापालिकेला उत्तर देता आले नाही. त्यामुळे आक्षेपांवर उत्तरे तयार करून पुढील बैठकीत पुन्हा सादरीकरण करण्याचे ठरविण्यात आले. या योजनेबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सर्वेक्षण करता येईल, मात्र योजनेचे प्रत्यक्ष काम करता येणार नाही, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून अहवाल अंतिम होईपर्यंत योजनेवरील स्थगिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पर्यावरणप्रेमींच्या विविध आक्षेपांचे लवकरच निरसन केले जाईल. त्यासाठी योजनेचे शास्त्रोक्त पद्धतीने सादरीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले, तर या योजनेचे सर्वेक्षण सुरू राहणार असून येत्या १५ दिवसांत आणखी दोन बैठका होऊन अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा नदीचे पुनरुज्जीवन करून सुशोभीकरण करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या योजनेबाबत पर्यावरणप्रेमी आणि संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती.

हेही वाचा :  VIDEO: "गाडी बाजूला घे, तुझी...," शाळेतून निघालेल्या मुलीची पोलीस कर्मचारीच काढत होता छेड; महिलेने रोखलं अन् नंतर....

याबाबत बोलताना शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘पर्यावरणप्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींकडून मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेबाबत नदी प्रवाहात निर्माण होणारे अडथळे, पूरस्थिती निर्माण झाल्यास उद्भवणारे संभाव्य धोके, नदी व परिसरातील जैव साखळीवर होणारा परिणाम आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. सर्व आक्षेप निरसन करण्याजोगे आहेत. बहुतांश बाबींचा समावेश प्रकल्प आराखडय़ात करण्यात आला आहे. पुढील आठवडय़ात बैठक घेऊन सर्व आक्षेप आणि शंकांबाबत शास्त्रोक्त सादरीकरण करण्यात येईल.’कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले म्हणाले, ‘या योजनेचे सर्वेक्षण सुरू राहणार असून येत्या १५ दिवसांत आणखी दोन बैठका होऊन अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे. बैठकीत नदी सुधार योजनेचे सर्वेक्षण सुरू ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पर्यावरणवादी संस्था, महापालिका आणि जलसंपदा विभागाने अहवाल संबंधित विभागांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

पर्यावरणप्रेमींचे आक्षेप काय?

या योजनेबाबत पर्यावरणाच्यादृष्टीने आमच्या आक्षेपांचे उत्तर महापालिकेला देता आले नाही. ही उत्तरे तयार करून पुढील बैठकीत सादरीकरण करण्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. योजनेवरील सर्व आक्षेप, शंकांचे निरसन होईपर्यंत सर्वेक्षण करता येईल, मात्र काम करता येणार नसल्याची अट प्रशासनाने मान्य केली. त्यामुळे योजनेवरील सर्व शंकांचे निरसन होईपर्यंत स्थगिती कायम राहील. योजनेचे हायड्रोलिक सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने झाले आहे, नदीच्या पूर पातळीत वाढ होणार आहे, नदीप्रदूषण वाढण्याची भीती असून नदीवहन क्षमता कमी होईल आणि जैवविविधतेवर परिणाम होईल, असे विविध आक्षेप असल्याचे पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :  जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत Chandrayaan 3...; ISRO ची मोठी घोषणाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …