Ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आऊट

Besuri Song Out : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) सध्या त्यांच्या आगामी ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ (Besuri) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर, टीझर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आता या सिनेमातील ‘बेसुरी’ हे गाणंदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘बेसुरी’ या गाण्याच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी देश म्युझिक नावाने म्युझिक लेबल सुरू केलं आहे. या लेबल अंतर्गत हे पहिलं गाणं आज रिलीज करण्यात आलं आहे.


News Reels

‘बेसुरी’ हे गाणं गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे. तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्युझिक लेबलद्वारे हे गाणं रिलीज केलं आहे. ‘बेसुरी’ या रोमॅंटिक गाण्यात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत. रितेशने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”आकर्षणातुन जडतं ते प्रेम आणि प्रेमातल्या वेडेपणात घडतं ते समर्पण”.

हेही वाचा :  ‘शेरशाह’ सिद्धार्थ मल्होत्राला पाहताच कियारा अडवाणीने मारली मिठी! ‘लव्ह बर्ड्स’चा व्हिडीओ चर्चे

‘वेड’ या सिनेमात जेनेलिया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Ved: रितेश-जेनिलियाचा ‘वेड’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …