नियमित हुक्का पिण्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध!

धुम्रपान हे शरीराला हानिकारक ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता हुक्का ओढणे हा प्रकार तरूण वर्गामध्ये लोकप्रिय होत चालला आहे. शिशा अथवा हुक्का यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात, पानपसंद, डबल अ‍ॅपल, मिंट, कोकोनट, चॉकलेट असे अनेक ठिकाणी मिळतात.

हुक्का हे सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे असे अनेकांना वाटते. मात्र असे अजिबात नाही. संशोधनातून आता सिद्ध झाले आहे की, हुक्क्याचेदेखील शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका यामुळे दिसून येतोय. याबाबत डॉक्टर विवेक तोश्निवाल, सल्लागार पल्मोनोलॉजी, केअर हॉस्पिटल्स, नमपल्ली, हैदराबाद यांनी विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य – iStock)

फ्लेवर्ड हुक्का म्हणजे नेमके काय?

फ्लेवर्ड हुक्का म्हणजे नेमके काय?

फ्लेवर्ड हुक्का अर्थात वॉटर पाईप अथवा शीशा (Sheesha Aka Hookah) या नावानेही ओळखला जातो. यामध्ये तंबाखू आणि अन्य घटक हीट करण्यासाठी चारकोलचा वापर करण्यात येतो असे डॉ. विवेक यांनी सांगितले. यामुळे धूर तयार होतो आणि तोंडाने यासह जोडलेल्या लांब नळीतून हा हुक्का ओढला जातो.

हेही वाचा :  Flax Seeds For Diabetes : साखर कंट्रोल करण्यासाठी अळशी गुणकारी, इन्सुलिन घ्यावच लागणार नाही

हुक्क्यामुळे होतो फुफ्फुसांवर परिणाम

हुक्क्यामुळे होतो फुफ्फुसांवर परिणाम

Flavored Hookah Side Effects: डॉ. विवेक तोश्निवाल यांच्या नुसार, हुक्का स्मोकिंगमुळे सर्वाधिक प्रभाव पडतो तो फुफ्फुसांवर. हुक्क्यातील धुरामध्ये असणारे उच्च स्तरीय कार्बन मोनोक्साईड, अन्य भारी धातू आणि विषारी पदार्थ हे फुफ्फुसांना नुकसान पोहचवतात. नियमित हुक्क्याचा वापर होत असेल तर त्याचा परिणाम हा फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसिझ (COPD) अथवा अन्य रेस्पिरेटरी आजारांचा धोका वाढण्यात होतो.

(वाचा – Weight Loss: वजन कमी करण्यासाठी १ चमचा अळीव ठरतील फायदेशीर, लोण्यासारखी वितळेल पोटावरील चरबी)

हृदयासाठीही ठरतो हानिकारक

हृदयासाठीही ठरतो हानिकारक

हुक्का प्यायल्याने हृदयाच्या आरोग्यालाही नुकसान पोहचते. हुक्क्यातील धुरामध्ये निकोटिन असते, जे हृदयातील स्पंदने आणि रक्तदाब (Blood Pressure) वाढवते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि याशिवाय हुक्क्यातील केमिकल हे फुफ्फुसांना डॅमेज करतात, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हृदयावरील तणाव वाढतो.

(वाचा – महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत हृदयविकार, जाणून घ्या कारणे आणि उपाय)

ओरल हेल्थवरही होतो परिणाम

ओरल हेल्थवरही होतो परिणाम

हुक्का प्यायल्याने मौखिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत असून सतत गरम येत असणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने तोंड सुजणे, तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्यांचा आजार आणि दात खराब होण्याचा धोकाही वाढतो. याशिवाय केवळ फुफ्फुसाचा कर्करोगच नाही तर ओरल कॅन्सर, इसोफेगल, कोलोरेक्टल कॅन्सर आणि ब्लॅडर कॅन्सरमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. विवेक यांनी सांगितले.

हेही वाचा :  Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीच्या नातीला अभीने दिलं गोंडस नाव, पुन्हा एकदा पारंपरिक नावांचा ट्रेंड

(वाचा – रमजानला खाल्ल्या जाणाऱ्या खजुराचे आहेत जादुई फायदे, रोज सकाळी खा भिजवलेले ४ खजूर)

हुक्क्यामुळे होणारे अन्य नुकसान

हुक्क्यामुळे होणारे अन्य नुकसान
  • हुक्का अधिक करणाऱ्या पुरूषांमध्ये वंधत्वाची समस्या
  • गर्भवती महिलांना पॅसिव्ह हुक्क्याच्या धुरामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी लो बर्थ वेट अथवा श्वासाच्या आजाराचाही सामना करावा लागू शकतो

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

कॅन्सर बरा होतो की नाही

Facts And Myths Of Cancer | कॅन्सर बरा होतो की नाही? या व्हिडिओत मिळेल तुम्हाला उत्तर || Maharashtra Times

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …