राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीन

राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीन

राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीन

पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर आता आणखी एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आलं आहे. राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर बीएमडब्ल्यू कार घालून ठार केलं आहे. चेन्नईत ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही तरुणाला जामीन मंजूर करण्यात आला. 

माधुरी वायएसआर काँग्रेस पक्षातील राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे. सोमवारी रात्री माधुरी बीएमडब्ल्यू चालवत होती. यावेळी तिची मैत्रीणही सोबत होती. यावेळी तिने चेन्नईतील बेसंत नगरमध्ये फूटपाथवर झोपलेल्या 24 वर्षीय सूर्याच्या अंगावर गाडी घातली. सूर्या हा पेंटर होता. माधुरी यावेळी मद्यधुंद अवस्थेत होती. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर माधुरीची मैत्रीण कारमधून बाहेर आली आणि तिथे जमलेल्या लोकांशी वाद घालू लागली. यानंतर काही वेळाने त्या घटनास्थळावरुन निघून गेला. जमलेल्या गर्दीपैकी काहींनी सूर्याला रुग्णालयात नेलं. पण गंभीर जखमी असल्याने त्याचा प्राण गेला. 

सूर्याचं आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याचे नातेवाईक आणि कॉलनीतील लोक जे-5 शास्त्री नगर पोलिस स्टेशनमध्ये जमले होते. हे सर्वजण कारवाईची मागणी करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना आढळलं क, कार बीएमआर (बीडा मस्तान राव) ग्रुपची आहे आणि ती पुद्दुचेरीमध्ये नोंदणीकृत आहे. माधुरीला अटक करण्यात आली होती पण पोलीस ठाण्यातच तिला जामीन मंजूर झाला होता.

हेही वाचा :  कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ... भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

राव 2022 मध्ये राज्यसभेचे खासदार झाले आणि ते आमदारही आहेत. बीएमआर समूह हे सीफूड उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, बीडा मस्तान राव यांच्याकडे 165 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

बीडा मस्तान राव 2009 ते 2019 पर्यंत टीडीपीमध्ये होते. या काळात ते 2009 ते 2014 या काळात आंध्र प्रदेशातील कावली मतदारसंघाचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश केला. 2022 मध्ये ते YSRCP चे राज्यसभा खासदार झाले.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट ‘मोठा भाऊ’? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून …

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

गडचिरोलीत ‘ऑपरेशन नक्षलगड’ फत्ते, 200 पोलीस सी-60 कमांडोंची शौर्यगाथा

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : गडचिरोलीत पोलीस चकमकीत12 कुख्यात आणि खतरनाक नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. …