Rajkummar Rao : मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता राजकुमार राव, आज आहे करोडोंचा मालक  

Rajkummar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने  करिअरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.  राजकुमार राव आज करोडोंचा मालक आहे. परंतु, एक काळ असा होता की, त्याच्या बॅंक खात्यात फक्त 18 रुपये शिल्लक होते. इतकेच नाही तर त्याला जगण्यासाठी मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागत होते. 

राजकुमार राव याने एका मुलाखतीमध्ये स्वत: त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारे काही किस्से शेअर केले आहेत. “मी मुंबईत आलो होतो, त्यावळी खूप लहान ठिकाणी राहत असे. एक काळ असा होता जेव्हा पैसे पूर्णपणे संपत असत. एकदा माझ्या मोबाईलवर मेसेज आला की माझ्या खात्यात 18 रुपये शिल्लक होते आणि माझ्या मित्राकडे 23 रुपये होते, असे राजकुमार राव सांगतो.  


राजकुमार याने सांगितले की, FTII हा एक मोठा समुदाय आहे. आम्ही त्यावेळी पैसे उधार घ्यायचो. इतकंच नाही तर अनेक वेळा तो मित्रांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण वाटून खात असे. एका वेळी टी-शर्ट खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.” 

हेही वाचा :  गायक, अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर!

राजकुमार राव याने सुरूवातीच्या काळात असे हलाखीत दिवस काढले आहेत. परंतु, आज तो करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्याने फिल्म इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

महत्वाच्या बातम्या

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

Badhaai Do : राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरच्या ‘बधाई दो’ सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शितSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …